Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News : विद्यार्थ्यांनी ठोकले शाळेला कुलूप; गणित विषयाला शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थी- पालक आक्रमक

Latur news : शाळेत गणित विषय शिकविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक नाही. अनेक वेळा मुख्याध्यापकाकडे गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक देण्याची मागणी करण्यात आली होती

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: लातूर जिल्ह्यातल्या लोदगा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गेल्या अनेक महिन्यापासून गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक नाही. मागणी करून देखील शिक्षक मिळत नसल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांनी चक्क शाळेला टाळे ठोकले आहे. यावेळी शाळेच्या गेट समोरच विद्यार्थी आणि पालकांनी ठिय्या मांडला. 

लातूर (Latur) जिल्ह्यातल्या लोदगा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला विद्यार्थ्यांनी कुलूप ठोकले आहे. शाळेत गणित विषय शिकविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक नाही. अनेक वेळा मुख्याध्यापकाकडे गणित विषय शिकवण्यासाठी (Teacher) शिक्षक देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र मुख्याध्यापकांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आज शाळेत जात कुलूप ठोकले आहे. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक देखील उपस्थित होते. 

दहावीचे वर्ष महत्त्वाचे विद्यार्थ्यांच्या (Student) आयुष्यातील महत्त्वाच वर्ष आहे. अशा वेळी जर गणित सारख्या महत्त्वाच्या विषयाचा शिक्षक नसेल तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याच काय होणार असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जातो आहे. यामुळे शाळेला कुलूप ठोकत शाळेच्या बाहेर ठिय्या आंदोलन मांडण्यात आले. यामुळे आता गणिताचा शिक्षक मिळेपर्यंत आम्ही शाळा उघडू देणार नाही असा पवित्रा हि विद्यार्थ्यांनी घेतला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT