Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News : पाच गावांची बत्ती गुल, ऑपरेटर मात्र नशेत धुंद; लातूरच्या शिवली मोड वीज उपकेंद्रात ओली पार्टी

Latur News : औसा तालुक्यातील शिवली मोड येथील महावितरणच्या उपकेंद्रावरून आजूबाजूच्या सहा गावांचा वीज प्रवाह जोडण्यात आला आहे. यातील ५ गावांचा वीज प्रवाह सायंकाळी ५ वाजेपासून खंडित झाला होता

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: लातूरच्या औसा तालुक्यातील शिवली मोड येथील विज उपकेंद्रात विद्युत कर्मचाऱ्यांनी ओली पार्टी केल्याचा (Latur) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या उपकेंद्रांतर्गत जोडलेल्या पाच गावांची (Mahavitaran) वीज प्रवाह खंडित झाल्याने ग्रामस्थ उपकेंद्रात आल्याने हा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Breaking Marathi News)

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील शिवली मोड येथील महावितरणच्या (MSEDCL) उपकेंद्रावरून आजूबाजूच्या सहा गावांचा वीज प्रवाह जोडण्यात आला आहे. यातील ५ गावांचा वीज प्रवाह सायंकाळी ५ वाजेपासून खंडित झाला होता, ग्रामस्थांनी उपकेंद्रात फोन केले असता, कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने गावातील काही नागरिक उपकेंद्रात धडकले. यावेळी येथे मटण व दारूची ओली पार्टी झाल्याचे निदर्शनास आले. काहींनी याचा व्हिडीओ तयार केला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑपरेटर नशेतच झोपलेला

५ गावातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिक विद्युत उपकेंद्रात गेल्यानंतर उपकेंद्र कर्मचारीच दारूच्या आणि बियरच्या बाटल्या घेऊन बसल्याच सांगण्यात येत आहे. दरम्यान नागरिकांनी येथील ऑपरेटरला उठविले असता तो नशेत असल्याने उठत नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलं की मुली? सोशल मीडियाच्या आहारी जास्त कोण जातं? हादरवणारी आकडेवारी

Kalyan : ईईssssss....आईस्क्रीममध्ये आढळली सापाच्या पिल्लाएवढी कीड, खाण्याआधी दहा वेळा विचार करा!

Moti Mangalsutra Designs: वटपौर्णिमेला खास लूक हवा? मोती मंगळसूत्राच्या या 7 ट्रेंडी सुंदर डिझाइन्स नक्की पाहा

Maharashtra News Live Update: परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

पब्लिक ट्रान्सपोर्टमधला जबरदस्त चमत्कार! एकाच स्टेशनवर थांबणार मोनो, मेट्रो आणि मुंबई लोकल

SCROLL FOR NEXT