एसटी  
महाराष्ट्र

खिचडी खाऊन एसटी कर्मचाऱ्यांची आगराच्या डेपोसमोर दिवाळी

खिचडी खाऊन एसटी कर्मचाऱ्यांची आगराच्या डेपोसमोर दिवाळी

दीपक क्षीरसागर

लातुर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. सर्व देशभरात दिवाळी धुमधडाक्यात आनंदाने साजरी करत आहेत; पण एसटी कर्मचारी आंदोलनात असल्याने एसटी डेपोसमोर खिचडी खाऊन दिवाळी साजरी करत आहे. (latur-news-msrtc-worker-strike-Diwali-in-front-of-ST-employees-depot-after-eating-khichdi)

लातुर जिल्ह्यातील एकूण पाच आगारातील सर्व आगारातील बसेस बंद आहेत. औसा तालुक्याच्या एसटी डेपोसमोर पुरुष आणि महिला कर्मचारी आता कोणी कोथिंबीर निवडत, कांदा चिरत, मिरच्या निवडतेय तर कोणी तांदूळ निवडत खिचडीची तयारी करत अत्यंत दुःखात दिवाळी साजरी करत आहेत. त्याच्या घरात मुलंबाळ आई बाबा फटाके आणतील लाडू चिवडा आदींचा मोठ्या आनंदात फराळ खायला मिळेल या आशेवर असताना नाईलाजाने एसटी कर्मचारी हक्काच्या मागण्यांसाठी आज सहाव्या दिवशी आंदोलनात आहे.

आंदोलन पहिले मग दिवाळी

राज्‍य परिवहन महामंडळातील कर्मचारींची दिवाळी तशी बाहेरच साजरी होत असते. परंतु, वेळातवेळ काढून परिवारासोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद देखील घेत असतात. मात्र मागण्यांसाठी आंदोलन पुकारले असल्‍याने काही ठिकाणी आंदोलन सुरूच आहे. यामुळे आंदोलन सोडून घरी जाता येत नाही. यामुळेच दिवाळी बस आगारात साजरी करावी लागत आहे. राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या अवस्थेची दखल घेत सकारात्मक आणि धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा एसटी आंदोलक व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT