NEET Exam Saam tv
महाराष्ट्र

NEET Exam: नीट परीक्षेचे पेपर फोडून लाखोंची माया जमाविली; जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार

नीट परीक्षेचे पेपर फोडून लाखोंची माया जमाविली; जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर जिल्हा हा शिक्षणाची पंढरी अशी ओळख आहे. पण याच शहरातील त्रिपुरा महाविद्यालयात संस्था चालकांनी (NEET) नीट परीक्षेचे पेपर फोडून लाखोंची माया जमवली आहे. याची उच्चस्तरिय चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची (Latur Marathi News) मागणी सांबदेव जोशी यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जोशी यांनी पत्रकार परिषदेत माहिती देत आरोप केला आहे. (Maharashtra News)

सांबदेव जोशी हे त्रिपुरा महाविद्यालयात सन 2018 ते 2021 दरम्यान शिक्षक (Teacher) म्हणून नोकरी करत होते. दरम्यान 12 सप्टेंबर 2019 सदरील नीट परीक्षेचे (NEET Exam) पेपर फोडण्याच्या कामात स्वतः जोशी यांच्यासह अन्य 22 व्यक्ती सहभागी झाले होते. याचे सीसीटीव्‍ही (CCTV) फुटेज तपासणी केल्यास सर्व बाबी आढळून येतील असा दावा केला आहे.

जीवे मारण्याची धमकी

याच संस्थेचे संस्थाचालक उमाकांत होनराव आणि त्याचे पुत्र ओंकार उमाकांत होनराव यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याने पेपर फोडण्याच्या काम केले असल्याची कबुली त्यांनी पत्रकार परिषदेत देत वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशीची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी नवी दिल्ली येथील नोयडाच्या नीट परीक्षा मुख्य संयोजक, आयुक्त औरंगाबाद आणि शिक्षणमंत्र्यांना निवेदनाच्या प्रती पाठवल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Address Update : आता घरबसल्या बदला आधारवरील पत्ता; नवीन Aadhaar App मुळे प्रक्रिया झाली सोपी

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Viral Video: ‘मी ड्रायव्हर आहे, नोकर नाही’, सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ड्रायव्हरने टॅक्सीतून उतरवलं, व्हिडीओ झाला व्हायरल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

स्मार्ट मीटर बसण्यापूर्वीच ४४० व्होल्टचा झटका; पाठवलं ५ महिन्यांचं वीजबिल, धक्कादायक प्रकरणाने राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT