Sanjay Bansode Latur News Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Bansode News: मंत्री संजय बनसोडेंच्या स्वागत बॅनरवर शरद पवारांच्‍या फोटोने वाद

मंत्री संजय बनसोडेंच्या स्वागत बॅनरवर शरद पवारांच्‍या फोटोने वाद

साम टिव्ही ब्युरो

संदिप भोसले

लातूर : राष्‍ट्रवादीचे आमदार फुटल्‍यानंतर राज्‍य सरकारला पाठींबा दर्शविला आहे. यात (Latur) लातूरचे आमदार संजय बनसोडे यांचा देखील समावेश आहे. त्‍यांची कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागली आहे. मंत्री झाल्‍यानंतर आमदार संजय बनसोडे (Sanjay Bansode) हे लातूरात येत असून त्‍यांच्‍या स्‍वागतासाठी शरद पवार यांचा फोटो लावला आहे. यामुळे येथे नवा वाद उद्‌भवला आहे. (Tajya Batmya)

लातूर जिल्ह्यातील उदगीर राखीव मतदार संघातून संजय बनसोडे हे आमदार म्हणून निवडून आले. पहिल्यांच वेळी ते राज्यमंत्री झाले. महाविकास आघाडीतही ते मंत्रिमंडळात होते. तर आताच्‍या राज्‍यातील घडामोडीत राज्‍य सरकारला पाठींबा दिलेल्‍या राष्‍ट्रवादीच्‍या आमदारात बनसोडे यांचा समावेश असून सध्या केलेल्या राष्ट्रवादीच्या बंडातही त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे.

फोटो काढण्याचा इशारा

दरम्यान संजय बनसोडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज उदगीरसह जिल्हाभरात संजय बनसोडे यांच्या स्वागताचे बॅनर झळकले आहेत. मात्र बॅनरवर शरद पवार यांचा दैवत म्हणून फोटो आहे. हा फोटो असल्‍याने (NCP) राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संजय शेट्टे यांनी नाराजी व्यक्त करत फोटो काढण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT