Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : लातूर-नांदेड महामार्गावर २ भीषण अपघात; थरारक घटनांचे CCTV फुटेज पाहा!

Latur News : लातूर-नांदेड महामार्गावर महिन्याभरात दोन भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही अपघाताच्या घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्या आहेत. हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Yash Shirke

संदीप भोसले, साम टीव्ही, प्रतिनिधी

लातूर-नांदेड महामार्गावरील नांदगाव पाटी येथे वारंवार अपघात घडत आहेत. एकाच महिन्यामध्ये या महामार्गावर सलग दोन भीषण अपघात झाले आहेत. या घटनांमुळे लातूर-नांदेड महामार्गावर अपघाताचे सत्र सुरु असल्याचे म्हटले जात आहे. या दोन्ही भीषण अपघातांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

एका महिन्यापूर्वी लातूर-नांदेड महामार्गावरच्या नांदगाव पाटी येथे एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा दुचाकीवरुन जात असताना अपघात झाला होता. या अपघातामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता. याच दरम्यान परवा (३ मार्च) त्याच ठिकाणी पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली.

महिन्याभरापूर्वी ज्या ठिकाणी अपघात झाला होता, तेथेच पुन्हा एकदा अपघात झाला. एका भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बस समोर दुचाकी आली. तेव्हा दुचाकीला वाचवण्याच्या नादात बसचालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले आणि बस उलटली. या अपघातामध्ये बसमधील ३६ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले, तर तीन प्रवाशांना कायमचे अपंगत्व आले.

जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या घटनांची दखल माजी आमदार धीरज देशमुख यांनी घेतली. प्रशासनाने या महामार्गावरील अपघाताचे ब्लॅक स्पॉट शोधून त्यासंबंधित उपाययोजना कराव्यात असे धीरज देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

SCROLL FOR NEXT