Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : कार- दुचाकीचा भीषण अपघात; जिममध्ये जाणाऱ्या दोन तरुणाचा मृत्यू

Latur News : दोघे मित्र रोज पहाटे व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जात. नेहमीप्रमाणे दोघेही आज सकाळी जिम करण्यासाठी घराबाहेर पडले. काही अंतरावर गेल्यानंतर त्यांच्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिली

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: रस्ते अपघातांची मालिका सुरूच आहे. दरम्यान लातूर शहरातल्या अंबाजोगाई रोडवर पहाटेच्या सुमारास कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये जिमसाठी निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला कारची धडक झाली. यात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना लातूर शहरात घडली आहे. 

लातूर शहरातील अंबाजोगाई रस्त्यावर पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात नहूश पाटील (वय २३) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर नरेंद्र जाधव या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नहूश आणि नरेंद्र हे दोघे मित्र रोज पहाटे व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जात होते. त्यानुसार नेहमीप्रमाणे दोघेही आज सकाळी उठून जिम करण्यासाठी घराबाहेर पडले होते. घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर त्यांच्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिली.  

दरम्यान दुचाकीने जाणाऱ्या दोघा तरुणांच्या गाडीला अंबाजोगाई रोडच्या कॉक्सिट कॉलेजजवळ भरधाव वेगाने आलेल्या कारने जोरदार धडक दिली. यात दोघेजण दूरवर फेकले गेले. यात नहूश पाटीलचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्तावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांनी जखमी नरेंद्रला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या अपघाताने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दोन दुचाकीची समोरासमोर धडक एकाचा मृत्यु
शिरूर (पुणे)
: शिरूर तालुक्यातील न्हावरे फाटा ते सोलापूर महामार्गावर करडे येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. हा अपघाताचा थरार सीसीटीव्ही कँमेरात कैद झाला आहे. या भीषण अपघातात बाळासाहेब थोरात यांचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. बाळासाहेब न्हावरे रोडने दुचाकीवरून करडे गावाकडे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक बसली आणि हा अपघात घडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

Shani Jayanti 2026: शनी जयंतीला होणार बुध-शुक्राचं गोचर; या राशींना मिळणार पैसाच पैसा

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

मुलीच्या हळदीत वडिलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लग्न घरावर कोसळला दुःखाचा डोंगर

Work From Home Jobs For Women: महिलांसाठी वर्क फ्रॉम होम जॉब्स, घरबसल्या झटक्यात कमवा लाखो रूपये

SCROLL FOR NEXT