Eknath shinde and Devendra Fadnavis  saam tv
महाराष्ट्र

Latur: लातूर जिल्ह्याला मंत्रिपद नाहीच, दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल?

लातूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांत नाराजीचा सूर सर्वाधिक आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर - काँग्रेसचे असो की भाजपाचे (BJP) सरकार. त्यामध्ये लातूर जिल्ह्याला स्थान हमखास असे. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या मंगळवारी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये लातूर जिल्ह्याला स्थान न मिळाल्याने नाराजी पसरली आहे. विशेष करून निलंगा, औसा आणि लातूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांत नाराजीचा सूर सर्वाधिक आहे.

जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी निलंगा आणि औसा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. लातूर शहर आणि लातूर (Latur) ग्रामीण काँग्रेसकडे असून, उदगीर आणि अहमदपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ठाकरे सरकारमध्ये जिल्ह्यातील दोघांचा मंत्रिमंडळात समावेश होता.

हे देखील पाहा -

आमदार अमित देशमुख कॅबिनेट तर आ. संजय बनसोडे राज्यमंत्री म्हणून काम पाहत होते. यापूर्वीच्या फडणवीस सरकारमध्ये आ. संभाजी पाटील निलंगेकर कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्याच विस्तारात कोणाची तरी वर्णी लागेल अशी अशा होती. मात्र, ती सध्यातरी फोल ठरली आहे. आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळेल, अशी आशा आहे.

जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार नाहीत. त्यामुळे शिंदे गटातून मंत्रिमंडळात वर्णी लागण्याचा विषयच नाही. परंतु, भाजपाचे जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यापैकी दोघे विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. तर एक विधानपरिषदेत आहेत. यापैकी कोणीही उघडपणे नाराजी व्यक्त केली नसली तरी सामान्य जनतेसह कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! १८ हजार २७६ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

Maharashtra News Live Update: मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित

SCROLL FOR NEXT