Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News : मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने संपविले जीवन; लातूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

Latur News : एकीकडे मराठा आरक्षणासाठी लढा सुरु असताना दुसरीकडे आरक्षणासाठी निर्णय घेतला जात नसल्याने राज्यात आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना मराठा आरक्षण (Maratha Aarkshan) मिळावं यासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. (Latur) लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात ही घटना घडली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील वाढवणा या गावात राहणाऱ्या माधव भांगे (वय २७) या तरुणाने स्वतःच्या शेतात गळफास घेत आपले जीवन संपवलं आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळण्यासाठी आंदोलन सुरूच आहे. दरम्यान मंत्री आणि पुढाऱ्यांना गावबंदी केली असताना त्यावेळी मंत्री संजय बनसोडे यांचा ताफा अडविण्यासाठी माधव भांगे यांने पुढाकार घेतला होता. आरक्षणावर अजूनही तोडगा निघाला नसल्याने माधव भांगे या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरक्षणासाठी लातूर जिल्ह्यातच ८ आत्महत्या 

एकीकडे मराठा आरक्षणासाठी लढा सुरु असताना दुसरीकडे आरक्षणासाठी निर्णय घेतला जात नसल्याने राज्यात आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र एकट्या लातूर जिल्ह्यात आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी एकूण ८ मराठा बांधवांच्या आत्महत्या केल्या असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC प्रभाग समित्यांवर शिंदेंचं वर्चस्व; शिवसेनेचे ५ सभापती, भाजप-मनसेला किती मिळाले?

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

SCROLL FOR NEXT