Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: आंध्र प्रदेशातील भाविकांचा औसा येथे अपघात; बाप– लेकीचा मृत्‍यू

आंध्र प्रदेशातील भाविकांचा औसा येथे अपघात; बाप– लेकीचा मृत्‍यू

दीपक क्षीरसागर

लातुर : आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथील व्यक्ती शिर्डी येथील देवदर्शनाहून परत जात असताना लातूर (Latur) जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वाघोली पाटीजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात (Accident) झाला. यात घटनास्थळी दोन व्यक्ती ठार झाले आहेत. तर चौघे गंभीर जखमी झाल्याने लातूरला हलवले आहे. या अपघातात वडील मुलगी जागीच ठार (Accident Death) झाले आहे. (Latur Accident News)

हैदराबाद येथील पाच व्‍यक्‍ती व सोबत चार बालके (Shirdi) शिर्डी येथील साईबाबांच्‍या दर्शनाला आले होते. साईबाबाचे दर्शन घेवून हैदराबादला परत जात असताना (Ausa) औसा तालुक्यातील वाघोली पाटीजवळ ट्रकसोबत समोरासमोर अपघात झाला. यात तनविका सायकुमार डूबली, सायकुमार डूबली या बाप– लेकीचा जागीच मृत्‍यू झाला.

पत्‍नीही गंभीर जखमी

पावित्रा सावरिया या गंभीर जखमी झाल्या असून लातूरात विवेकानंद हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान अपघातातील नविश, श्याम आणि शौर्य हे किरकोळ जखमी झाले आहेत. घटनस्थळी किल्लारी पोलिसांनी धाव घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK: भारत तुमचं कंबरडं मोडणार! शोएब अख्तरचा पाकिस्तानला एशिया कपपूर्वी इशारा

ठाकरे-पवारांना एकही नगरपालिका मिळता कामा नये - गिरीश महाजन

Maharashtra Live News Update: बीड शहरात गुंडाचा नंगानाच, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचंही उल्लंघन

प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लॉजवर जबरदस्ती अन् शारीरिक संबंध; १४ वर्षीय मुलीसोबत 'नको ते घडलं'

Ladaki Bahin Yojana : विभक्त रेशनकार्डधारक सुना 'लाडकी बहीण' साठी पात्र; नेमका काय आहे प्रशासनाचा निर्णय, वाचा

SCROLL FOR NEXT