Latur Crime News : गेल्या वर्ष भरापासून लातूर शहरातील बहुतांश लॉजवर खुलेआम वेश्याव्यवसाय आणि इतर गैरकृत्य होत असल्याने शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा धोक्यात आलेला आहे. शाळकरी मूले-मुली, कॉलेज मधील तरुण तरुणी बिनधास्तपणे औसातील लॉजवर दिसून येत आहेत. हा प्रकार तात्काळ बंद व्हावा आणि लॉजवर कार्यवाही करुन ते बंद करण्यात यावे, या मागणीसाठी संतप्त औसेकरांनी औसा तहसील कार्यालय गाठून तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी, महिलांची संख्या लक्षणीय होती हे विशेष.
औसा शहर सूफी संताची भूमी असून शहराला ऐतिहासिक वारसा आहे. अशा शहरात मागील अनेक महिन्यांपासून अनेक लॉजवर देहविक्री तसेच इतर गैर कृत्य सर्रासपणे केले जात आहेत. अल्पवयीन मुलीला लॉजवर आणून देह विक्री करण्यात येत आहे. याबाबत या पूर्वीही अनेक सामाजिक संघटनांनी पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन दिले होते.
काही दिवसच हा व्यवसाय बंद राहिला आणि पुन्हा मोठ्या प्रमाणावर हा वेश्याव्यवसाय सुरू झाला. लॉजवर प्रवेश करताना कुठल्याच प्रकारे शासकीय नियमांचे पालन केले जात नाही. यात आधार कार्ड, येणाऱ्या जोडप्याची रजिस्टरवर नोंद नसणे शाळकरी अल्पवयीन मूले -मुली या लॉजवर जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापिक करीत आहेत. यामुळे शहरातील वातावरण दुषीत होत आहे. सदर लॉजवर तातडीने कारवाई करून असे लॉज बंद करण्यात यावे आणि अशा लॉजचे परवाने रद्द करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.