Latur Crime Saam tv
महाराष्ट्र

Latur Crime : मिरवणुकीवरून दोन गटात वाद; वादात मारहाण केलेल्या शिक्षकाचा मृत्यू, १० जणाविरुद्ध गुन्हा दाखल

Latur News : औंढा गावात २५ एप्रिलला रात्री आठ वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुक काढण्यात आली आहे. मिरवणुकीत दोन वेगवेगळ्या समाजात वाद झाला हा वाद मिटला होता

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: लातूरच्या निलंगा तालुक्यातील औंढा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकी दोन गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर तुफान दगडफेक आणि हाणामारीत झाले. या हाणामारीत शिक्षकाला देखील मारहाण करण्यात आली. यात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

लातूर जिल्ह्यातील औंढा (ता. निलंगा) येथे घडलेल्या घटनेत गुरुलिंग हासुरे असे मृत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. औंढा गावात २५ एप्रिलला रात्री आठ वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुक काढण्यात आली आहे. मिरवणुकीत दोन वेगवेगळ्या समाजात वाद झाला. हा वाद मिटला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार (२६ एप्रिल) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास गावातील दत्तू मारोती गायकवाड याने जयंतीवरुन वाद का केला? असे म्हणून समोरच्यांसोबत हुज्जत घातली. याचे पर्यावसान हाणामारीमध्ये झाले. 

शेतात काम करणाऱ्या शिक्षक केली मारहाण 

अचानक घडलेल्या या प्रकाराने गावात लोकांची एकच धावपळ निर्माण झाली होती. यावेळी बडूर येथील शिक्षक गुरुलिंग अशोक हासुरे (वय ३८) हे आपल्या शेतात काम करत होते. यावेळी आरोपींनी गुरुलिंग देखील औंढा गावचा आहे. असे म्हणत हासुरे यांना जबर मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाचा मृत्यू झाला. 

दहा जणांवर गुन्हा दाखल 

घडल्या प्रकारानंतर कासार सिरसी ठाण्यात मयताच्या काकाने दिलेल्या फिर्यादीवरुन दत्तू मारोती गायकवाड (रा. औंढा), अजय महेश चौंडा, अझर मोहम्मद, आदित्य मोरे, गजेंद्र शिवराज सरवदे, स्वप्निल सूर्यवंशी (सर्व रा. कासार सिरसी), संजय लक्ष्मण गायकवाड, राजेंद्र गोरख गायकवाड, शहाजी किशन गायकवाड (रा. औंढा) याच्यासह अन्य एका अनोळखीविरोधात गुन्हा दाखल केला. तपास पोउपनि. अजय पाटील हे करीत आहेत. पोलिसांनी यातील काही जणांना ताब्यात घेतले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात जलशुल्क दरवाढीला सतेज पाटील यांचा विरोध

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT