Latur Crime Saam tv
महाराष्ट्र

Latur Crime : पेट्रोल पंपावर राडा; किरकोळ कारणातून कर्मचाऱ्याला मारहाण

Latur News : संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी सदर कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून किल्लारी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या चार जणांनी गोंधळ घालत राडा केला. किरकोळ कारणावरून निर्माण झालेल्या वादातून हा गोंधळ घालत या चौघांनी मिळून पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

लातूरच्या औसा तालुक्यातील किल्लारी येथील पेट्रोल पंपावर जबर मारहाणीची घटना घडली आहे. किल्लारी येथील पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या चार जणांनी किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याशी वाद घालण्यास सुरवात केली. यानंतर त्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याची घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 

चौघांवर गुन्हा दाखल 

दरम्यान या घटनेनंतर पंपावर एकच गोंधळ पाहायला मिळाला. काही जणांनी मध्यस्थी करत कर्मचाऱ्याला सोडविले. संपूर्ण घटना  CCTV मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी सदर कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून किल्लारी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. 

महागड्या पैठणीची चोरी सीसीटीव्ही मध्ये कैद
नाशिकच्या येवला शहरातील बुरुड गल्लीत असलेल्या सुरेखा पैठणी दुकानात पैठणी खरेदीसाठी आलेल्या दोन महिलांनी दुकानदाराला पैठणी दाखवण्यास सांगत बोलण्यात गुंतवून सुमारे १ लाख ७० हजार रुपये किमतीच्या महागड्या पैठणीची बेमालूम पद्धतीने पैठणीची चोरी केल्या. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पैठणी दाखवत असताना उभ्या असलेल्या महिलेने दुकानदारांची नजर चकवून पैठणी अंगावरील साडीत लपवली ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT