Latur Crime Saam Tv
महाराष्ट्र

Latur Crime : धक्कादायक! मित्राच्या मदतीने काढला सख्ख्या भावाचा काटा; डोक्यात गोळी झाडून हत्या

या प्रकरणी लातूर पोलिसांनी पिस्टल, मोटारसायकलसह दोघांना अटक केली असून अटकेतील दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

दीपक क्षीरसागर

Latur Crime News : कुटुंबीयांचा सतत छळ करणाऱ्या सख्ख्या भावाचा मित्राच्या मदतीने डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणी लातूर पोलिसांनी पिस्टल, मोटारसायकलसह दोघांना अटक केली असून अटकेतील दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सूरज मुळे हा आई, बहीण आणि भावाला दारू पिऊन सतत छळत होता. दरम्यान, या छळाला कंटाळून भाऊ धीरज आई-बहिणीला घेऊन पुण्याला (Pune) गेला होता. तेथे त्याने सुरक्षारक्षक म्हणून नोकरी स्वीकारली होती. दरम्यान, दारुडा भाऊ सतत आपल्याला छळत असल्याचा राग मनात खदखदत होता.

त्यातच त्याने सख्ख्या भावाची हत्या करण्याचा कट पुण्यात रचला. त्यासाठी गावठी बनावटीचे पिस्टल त्याने खरेदी केले. सूरजवर पाळत ठेवण्याची, रेकी करण्याची जबाबदारी त्याने मित्र अमर गायकवाड याच्यावर दिली होती. पाळत ठेवून सोमवारी रात्री तो पुण्यातून लातुरात (latur) आला.

मित्र अमर गायकवाड याची मोटारसायकल घेऊन धीरज घरी गेला. झोपेत असलेल्या सूरजच्या डोक्यात गोळी झाडली. ते दोघेही भातखेडा येथे आले आणि त्यानंतर धीरज पुन्हा रातोरात पुण्याला निघून गेला. गुन्ह्यात वापरलेले पिस्टल हे मित्राच्या घरी लपविल्याचे पोलीस तपासात समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT