Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News: नाव बदलून प्रेमाच्‍या जाळ्यात ओढले; बारा वर्षांनंतर बलात्काराची तक्रार

नाव बदलून प्रेमाच्‍या जाळ्यात ओढले; बारा वर्षांनंतर बलात्काराची तक्रार

दीपक क्षीरसागर

लातूर : उदगीर शहरातील अशोकनगर येथे वास्तव्यास असलेल्या एका तरुणीस आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नाव बबलू इस्माईल सय्यद असताना स्वतःचे नाव राज सुभाष कांबळे असल्याची बतावनी करुन सदर पिडीतेसोबत गेली १२ वर्षे शारिरिक संबंध प्रस्थापित केले. एक मुलगी झाल्यानंतर लग्न (Marriage) करण्यास नकार देत पळून गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बारा वर्षानंतर उदगीर शहर पोलिसांत फरार नराधम तरुणाविरोधात (Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

उदगीर शहरातील एका परिसरातील २५ वर्षीय तरुणीसोबत २०११ मध्ये बबलू इस्माईल सय्यद याच्याशी ओळख झाली. सुरूवातीला याने स्वतःचे नाव राज सुभाष कांबळे असल्याची बतावणी करुन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर लग्नाचे आमिश दाखवून तिला पुणे येथे घेवून गेला. पिडीतेसोबत वारंवार शारिरिक संबंध प्रस्थापीत केले. त्यानंतर या तरुणीस एक मुलगी झाली.

लग्‍नास दिला नकार

सदर तरुणीने त्याच्यामागे लग्नाचा तगादा लावल्यानंतर ११ ऑक्टोबर २०२२ रोजी पिडीत तरुणीस व तिच्या मुलीस एकटेच सोडून घरातून निघून गेला. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच सदर तरुणीने उदगीर गाठले आणि त्याच्याविरोधात उदगीर शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारिच्या आधारे बबलू इस्माईल सय्यद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Sleeping Time: वयानुसार तुम्ही किती तास झोपले पाहिजे? जाणून घ्या

Parth Pawar: कुणी चुकीचे काम करत असेल तर...; पार्थ पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Janhvi Kapoor: वेडिंग सीझनसाठी परफेक्ट आहे जान्हवीचा 'हा' लूक तुम्हीही करु शकता रिक्रिएट

१८० किमी वेगाने धावणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन; लोको पायलटच्या केबिनमधून सुवर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Rupali Bhosle Serial: अभिनेत्री रूपाली भोसलेची पहिली मराठी मालिका कोणती होती?

SCROLL FOR NEXT