Akola Crime News Saam Digital
महाराष्ट्र

Latur Crime News : बदलापूरसाखीच आणखी एक घटना; ४ वर्षांच्या मूलीसोबत लैंगिक गैरवर्तन

Latur Crime : बदलापूरमधील घटना ताजी असतानाच लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यात एका ४ वर्षांच्या चिमुकलीसोबत लैंगिक गैरवर्तन करण्यात आलं आहे. त्यामुले संतापाची लाट उसळली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संदीप भोसले, साम टीव्ही प्रतिनिधी

बदलापूरमधील घटना ताजी असतानाच लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यात एका ४ वर्षांच्या चिमुकलीसोबत लैंगिक गैरवर्तन करण्यात आलं आहे. त्यामुले संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु्न्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

अकोल्यात ६ मुलींचा लैगिंक छळ

अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात हा संतापजनक प्रकार समोर आलाय. तालुक्यातल्या काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने अश्लिल व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थीनींचा छळ केल्याची ही घटना आहे. ही खळबळजनक घटना आज मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली. याप्रकाराने जिल्हाभरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदच्या उच्च माध्यमिक शाळेतील प्रमोद सरदार नामक शिक्षकाने मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेत आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनींना अश्लिल व्हिडिओ दाखवत त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप या शिक्षकावर आहे. चित्रफित दाखवित असताना त्याने मुलींना वाईट पद्धतीने स्पर्श करत अश्लील संभाषण केले. हा प्रकार मागील चार महिन्यांपासून सुरू असल्याचा आरोप या शिक्षकांवर विद्यार्थीनींनी केला आहे.

आज मंगळवारी पीडित विद्यार्थिनींनी या घटनेसंदर्भात पालकांना सांगितल्यानंतर त्यांना धक्का बसलाय. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. दरम्यान विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक प्रमोद सरदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earthquake : मणिपूरला भूकंपाचे हादरे! ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Gold Rate Today: खुशखबर! चांदी ₹१०,०००नी स्वस्त ! सोन्याचे दर किती? वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Periods Mental Health : पीरियड्समध्ये न चुकता करा 'ही' कामे, चिडचिड अन् मूड स्विंग्स होणारच नाही

Who Is Rajnandini Pawar: महाराष्ट्राची कन्या देशात ठरली सर्वात सुंदर! कोण आहे राजनंदिनी पवार? 'मिस इंडिया 2026' ची उपविजेती

Bhendwal Bhavishyvani: यावर्षी पाऊस कसा राहिल? शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा; देशावर आर्थिक संकट, वाचा भेंडवळच्या घटमांडणीचा A टू Z अंदाज

SCROLL FOR NEXT