Latur Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Latur Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! धाकट्या भावनेचं काढला थोरल्या भावाचा काटा; कारण ऐकून व्हाल थक्क

Latur Crime News : लातूर जिल्ह्यात शेतीच्या वाटणीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • शेतीच्या वाटणीवरून सख्ख्या भावांमध्ये वाद वाढला

  • लहान भावाने दोरीने गळा आवळून मोठ्या भावाची हत्या केली

  • मृतदेह नाल्यात फेकून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला

  • पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपीला अटक केली; तपास सुरू

'सख्खा भाऊ पक्का वैरी' या म्हणीप्रमाणेच लातूरच्या रामलिंग मुदगड येथे धक्कादायक घटना घडली आहे. शेतीच्या वादातून लहान भावानेच मोठ्या भावाची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव गुलाब विलास खरोसे असे आहे, तर आरोपीचे नाव उल्हास खरोसे असे आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुलाब खरोसे आणि उल्हास खरोसे हे दोघेही सख्खे भाऊ होते. दोन्ही भावांमध्ये वडील पारित असलेल्या ८ एकर शेतीच्या वाटणीवरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. रात्री मोठा भाऊ मृत गुलाब खरोसे (वय ३४ ) हा शेताकडे निघाला. आरोपी उल्हास खरोसे हा आधीपासून रस्त्यात डब्बा धरून बसला होता.

गुलाब खरोसे येताच उल्हासने त्याच्यावर हल्ला केला. त्याचा दोरीने गळा आवळून डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. मृतदेह बाजूलाच असलेल्या नाल्यात फेकून देत,आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच कासार-शिरशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनेचा पंचनामा केला.आरोपीला 48 तासाच्या आत पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT