Latur : अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात व्यसनाधीन रावणाचे दहन! दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

Latur : अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात व्यसनाधीन रावणाचे दहन!

लातुर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात विजयादशमीचे औचित्य साधून शासकीय ग्रामीण रुग्णालय अहमदपुर व सृजन संस्थेच्या वतीने व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी व्यसनाधीन रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातुर : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात विजयादशमीचे औचित्य साधून शासकीय ग्रामीण रुग्णालय अहमदपुर व सृजन संस्थेच्या वतीने व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी व्यसनाधीन रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. युवा पिढी व्यसनाधीनतेची शिकार बनत आहे. भारतातील कर्करोग्यांची संख्या यावर्षी १३.९ लाख असून ती २०२५ पर्यंत १५.७ लाखापर्यंत जाणार असल्याचा अंदाज भारतीय वैज्ञानिक संशोधन परिषद (आयसीएमआर) या बंगलोर येथील राष्ट्रीय रोग सूचना विज्ञान आणि संशोधन केंद्र (एनसीडीआयआर) यांनी व्यक्त केला आहे.

हे देखील पहा :

अहवालानुसार यंदा पुरुष कर्करोग्यांची संख्या सहा लाख ७९ हजार ४२१ एवढी गृहीत धरली असून २०२५ पर्यंत ती सात लाख ६३ हजार ५७५ पर्यंत पोहोचेल. यात महिलांना कर्करोग होण्याचे प्रमाण या वर्षी अंदाजे सात लाख आहे तर २०२५ पर्यंत बारा लाख होण्याची चिन्हे आढळून येत आहेत. त्यामुळे राज्यातुन सर्वच स्तरावरुन विरोध होणे अपेक्षित आहे. व्यसन हे शरिरासाठी हाणिकारकच आहे. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवनापासून अनेक अजार उद्वभतात.यामूळे तंबाखू, गुटखा, सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थावर व उत्पादनावर कडक बंदी लादली गेली पाहिजे. या उद्देशाने सृजन संस्थेच्या वतीने हा व्यसनमुक्त समाज जनजागृती साठी उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी आरोग्य कर्मचारी डॉ.दत्ता बिरादार, डॉ. धीरज देशमुख ,डॉ. सुरजम सिहांते, डॉ. अपर्णा मेकले,परिचारीका सुनिता पारधी,जयश्री पडिले सहाय्यक कर्मचारी किशोर सातपुते, गोविंद कच्छवे, बस्वराज लोहारे,रमेश मुंडे, किशोर सातपुते, कलाध्यापक तुकाराम देवकत्ते, महादेव खळुरे, अविनाश धडे, कैलास मोरतळे आदिच्या उपस्थितीत रावणाचे दहन करण्यात आले. बाल कलावंत श्रीनिवास धडे यांनी टाकाऊ वस्तूपासून दोन दिवसात हा रावणाचा पुतळा साकारला. प्रेम घंटेलवाड , साखर भालके, ओम धडे, विविध धडे, आर्यन आपटे विकास धनेवाड, महेश खंडागळे, किशोर आडाव आदि विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT