Latur Accident News Saam tv
महाराष्ट्र

Latur Accident News: भरधाव ट्रक गतिरोधकावरून उडाला अन्‌ थेट घरात घुसून झाला पलटी

भरधाव ट्रक गतिरोधकावरून उडाला अन्‌ थेट घरात घुसून झाला पलटी

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूरहून अंबाजोगाईकडे भरधाव वेगात जात असलेल्‍या कापसाची वाहतूक करणारी ट्रक गतिरोधकावरून जम्प घेऊन एका घरात घुसून पलटी होऊन (Accident) अपघात झाल्याची घटना घडली आहे. अंबाजोगाई हायवेवर लातूर (Latur) शहरालगत असलेल्या बोरवटी पाटीवर येथे हा अपघात घडला. (Latest Marathi News)

लातूर– अंबाजोगाई मार्गावर झालेल्‍या या अपघातात ट्रक कर्नाटकच्या गफूर येथून कापूस घेऊन बीड जिल्ह्यातील केज येथे जात असताना अंबाजोगाई हायवेवर लातूर शहरालगत असणाऱ्या बोरवटी पाटीवरील गतिरोधकावर ट्रक जम्प झाला. त्यामुळे ट्रक चालक असिफ याचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक थेट रोडलगत असलेल्या एका घरात घुसला आणि पलटी झाला.

सात लाखाचे नुकसान

सदर अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र घराची भिंत पडून आणि ट्रकचे सुमारे ५ ते ७ लाखांचे नुकसान झाल्‍याचा अंदाज वर्तविला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT