latur accident news Saam tv
महाराष्ट्र

Latur Accident News : लातूरमध्ये ऊस तोडणी करणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू

लातूरमधून अपघाताची धक्कादायक बातमी हाती आली आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूरमधून धक्कादायक बातमी हाती आली आहे. लातूरमध्ये ऊस तोडणी करण्यासाठी एकच मोटारसायकलवरून कुटंब निघालं होतं. पण ऊस तोडणी करण्याच्या ठिकाणी पोहोचण्याआधीच कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. मोटार सायकल आणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

लातूरमध्ये मोटारसायकल आणि पिकअपची समोरासमोर धक्कादायक अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात (Accident) चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जाण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. लातूर तालुक्यातील हाकेवाडी या तांड्यावरील हे कुटुंब आहे.

नेमका अपघात कसा झाला?

लातूर (Latur) तालुक्यातील हाकेवाडी या तांड्यावरील रहिवाशी असलेले कुटुंब ऊस तोडणीच्या कामासाठी जात होतं. हाकेवाडीमधील हे कुटुंब कर्नाटकातून ऊस तोड कामावरून परत आलं होतं. त्यानंतर हे कुटुंब १५ दिवस तांड्यावर राहिलं. त्यानंतर पुन्हा ऊस तोडणीच्या कामासाठी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असणाऱ्या रांजणी येथील नॅचरल शुगर अलाईड प्रा. लि. साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी निघालं.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर या तालुक्याच्या ठिकाणाहून त्यांनी आठवडी बाजार केला. त्यानंतर एकाच दुचाकीवरून सहा जणांनी रांजणीची वाट धरली. हे कुटुंब लातूरपासून वीस एक अंतरापर्यंत पुढे आलं होतं. यावेळी काटेगावाजवळ समोरून शिमला मिरची घेऊन येणाऱ्या पिकअपची आणि त्यांच्या दुचाकीला धडक जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील विकास प्रकाश आडे, आकाश प्रकाश आडे, विकास आडे यांची मुलगी वैशाली आडे, आकाश आडे यांचा मुलगा शंकर आडे हे चौघेजण जागीच ठार झाले. तर या अपघातात प्रकाश आडे या दोन भावांची आई निर्मला प्रकाश आडे आणि त्यांची नात अर्थात विकास आडे यांची मुलगी रोहिणी या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. चौघांचा जागीच मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ‘टीईटीच्या परीक्षेला महिला परीक्षार्थींना दुपट्टा,बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य

मोठी बातमी! चार महिन्यातच तुकाराम मुंढेंना पालक सचिवपदावरून हटवलं

Wednesday Horoscope : प्रगतीची दारं खुली होणार, ५ राशींना अचानक धनलाभ होणार; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Beed News: पोहायला गेला अन् परतलाच नाही! परळीत तरुण बेपत्ता

PUC Rule Changes: खुशखबर! PUC नियम बदलणार, वाहनधारकांची झंझट मिटणार; नवीन वाहनांना मिळणार मोठी सूट

SCROLL FOR NEXT