Latur Mother Son Accident News  Saam TV
महाराष्ट्र

Latur Accident News: भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं; आईचा जागीच मृत्यू, वेळेवर मदत न मिळाल्याने मुलानेही सोडला जीव!

Latur Accident News: लातूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. दुचाकीवरून कामानिमित्त बाहेर निघालेल्या आई आणि मुलाला भरधाव वेगात येणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली.

साम टिव्ही ब्युरो

संदीप भोसले, साम टीव्ही

Latur Mother Son Accident News: लातूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. दुचाकीवरून कामानिमित्त बाहेर निघालेल्या आई आणि मुलाला भरधाव वेगात येणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत आईसह मुलाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (१६ मे) सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. (Breaking Marathi News)

अविनाश रमेश राऊत (वय २४ वर्ष) आणि शांताबाई रमेश राऊत (वय ५२ वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकांची नावे आहेत. दोघेही सारोळा (Latur News) येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश राऊत हा काही कामानिमित्त आपल्या आईला सोबत घेऊन दुचाकीवरून बाभळगाव जाण्यासाठी निघाला होता.

दरम्यान, दुचाकीवरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी (Accident) भीषण होती, की यामध्ये शांताबाई राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. तर रमेश गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिकेला फोन केला.

मात्र, रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने अतिरक्तस्राव होऊन रमेश याचाही मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी रमेश आणि त्याच्या आईचा अपघात झाला. त्याठिकाणाहून अगदी हाकेच्या अंतरावर बाभळगाव रुग्णालय होते.  (Latest Marathi News)

मात्र, रुग्णालयात एकही कर्मचारी हजर नसल्याने आणि रुग्णावाहिका तब्बल १ तास उशीरा आल्याने रमेश याचा जीव गेल्याचं नातेवाईकांनी म्हटलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT