Sharad Pawar News Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar News: पंतप्रधानपदाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मी पुढची निवडणूकच लढवणार नाही...

Sharad Pawar statement on Prime Minister Post: मात्र आता शरद पवारांनी स्वत: यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Ruchika Jadhav

Political News: येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव पंतप्रधान पदाच्या निवडणुकीसाठी घेतलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान पदाच्या शर्यतीत त्यांचं नाव घेतलं जात आहे. मात्र आता शरद पवारांनी स्वत: यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपण पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सोमवारी पुण्यातील बालगंधर्व मंदिर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं आहे. राज्याच्या राजकारणात शरद पवारांचं नाव फार मोठं आहे. राजकारणाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. विरोधकांचा पराभव करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचं अनेक नेते मंडळी म्हणतात. त्यामुळे यावेळी पंतप्रधान पदी ते असणार अशी चर्चा रंगू लागली होती. परंतू शरद पवारांनी या संपूर्ण चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

काय म्हणाले शरद पवार?

पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी अजिबात नाही. या देशासाठी आम्हाला स्थिर आणि विकासाला चालना करणारे नेतृत्व हवे आहे. उद्या जनता ज्यांना उत्तम प्रकारची साथ देईल त्यातून असे नेतृत्व काढता येईल. अशा नेत्यांना पूर्ण साथ देणे आणि मदत करणे ही माझ्यासारख्या नेत्याची जबाबदारी आहे. मी पुढची निवडणूकच लढवणार नाही, त्यामुळे पंतप्रधान पदाचा संबंधच येत नाही”, असं शरद पवार म्हणाले.

यावेळी अनिल देशमुखांविषयी बोलताना त्यांनी म्हटलं की, अनिल देशमुखांनी शैक्षणिक संस्थेसाठी घेतलेली रक्कम अजूनही त्या शैक्षणिक संस्थेच्या खात्यात आहे. ती रक्कम खर्चही झालेली नाही. यावरून अनिल देशमुखांना १३ ते १४ महिने तुरुंगवास म्हणजेच सध्याचे शासन हे सत्तेचा कसा गैरवापर करत आहे. याचे हे उत्तम उदाहरण आहे, असे शरद पवार पुढे म्हणाले.

जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, 'माझ्याकडे पूर्ण माहिती नाही, पण महाराष्ट्रात चांगले काम करणारे प्रशासक असे जयंत पाटील यांचे व्यक्तिमत्व आहे. आज त्यांना कशासाठी बोलावलं याची कल्पना नाही. ईडी सारख्या संस्थांचा गैरवापर कसा होतो याच हे उदाहरण आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News: साताऱ्यातील महिला डॉक्टरवर दबाव टाकणार 'तो' खासदार कोण? VIDEO

Satara News : डॉक्टर महिला बीडची असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रारी डावलल्या? माजी मंत्री धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

Doctor Death Case Satara: ही आत्महत्या नाही… व्यवस्थेने केलेला खून! फलटणच्या डॉक्टर मृत्यूचं गूढ वाढतंय|VIDEO

Maharashtra Live News Update: अमित शहा सोमवारी मुंबईत दौऱ्यावर

टेस्लाच्या स्क्रीनवर दिसतात भुतं? टेस्लामध्ये खरंच रात्री भुतं दिसतात?

SCROLL FOR NEXT