Nashik Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Crime News: खळबळजनक! सोन्याच्या दागिन्यांनी घेतला जीव; घरात घुसून चोरट्यांनी केली महिलेची हत्या

Theft Gold Jewellery: सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.

साम टिव्ही ब्युरो

तरबेज शेख

Nashik News: प्रत्येक महिलेलाल सोन्याचे दागिने घालण्याची फार हाउस असते. दागिने घालून मिरवणं अनेक स्त्रियांना आवडतं. मात्र दागिने घालणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे. महिलेच्या अंगावर असलेले दागिने चोरी करण्यात आलेत. या चोरीच्या घटनेत नराधमांनी महिलेची हत्या देखील आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. (Latest Nashik Theft News)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक (Nashik) उपनगर परिसरातील हनुमंत नगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. राहत्या घरात घुसून महिलेची हत्या करण्यात आलीये. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. महिला बेशुद्ध अवस्थेत घरात पडलेली होती. तिच्या डोक्यात जखम होऊन मोठा रक्तस्त्राव देखील झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेखा उर्फ पुष्पा श्रीधर बेलेकर (वय ६० राहणार हनुमंत नगर स्कीम नंबर एक स्वानंद रोड हाऊस ) असे महिलेचे नाव आहे. दूधवाला दूध देण्यासाठी महिलेच्या घरी आला होता. त्यावेळी महिलेने दरवाजा उघडला नाही. तसेच कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

त्यामुळे दूधवाल्याने शेजारी राहणाऱ्या मयत महिलेच्या सुनेला कळवली. त्यानंतर सून तातडीने घरी आली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मागच्या दाराने घरात गेल्यानंतर आपली सासू जमिनीवर खाली पडलेली सुनेला दिसली. यावेळी सासूच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सासूला पाहून महिलेच्या पायाखालची जमिनच सरकली.

यावेळी घरातील टीव्ही, फॅन चालू असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान जखमी महिलेला बिटको रुग्णालयात दाखल केले. उपचारदारम्यान डॉक्टरांनी महिलेला मयत घोषित केले. शवविच्छेदनासाठी महिलेचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात (Hospital) पाठवण्यात आला. शवविच्छेद अहवालानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. चोरीच्याच (Theft) उद्देशाने महिलेची हत्या झाली आहे की, यामागे आणखी काही कारण आहे याचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी अमरावतीत पावसाची दमदार हजेरी

माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षात उभी फूट; 20 खासदारांनी बनवला वेगळा गट, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय नाहीतर...

Aali Lakhabai Song: रौद्र रूप, दमदार नृत्य अन् लोकसंगीताची जादू; अमृता धोंगडेचा 'आली लखाबाई' गाणं प्रदर्शित

Navi Mumbai : सलग ३-४ दिवस लाईट नसल्यानं महिलेचा आक्रोश; उशी - चादर घेऊन थेट महावितरणच्या ऑफिसमध्ये पोहोचली, VIDEO

SCROLL FOR NEXT