संजय राठोड -
यवतमाळ : प्रत्येक घरामध्ये लहान मोठे वाद होत असतात हे वाद सगळ्यांच्या अंगवळणी देखील पडतात. वाद, भांडणांशिवाय घराला घरपण देखील येत नसतं. मात्र आर्णी (Arni) येथील सासू-सूनेचा वाद चित्रपटातील दृश्य सारखा वाटावा असा पहायला मिळाला आहे. शिवाजीनगर (Shivajinagar) मध्ये राहणाऱ्या सासू आशा पोजरवार आणि सून सरोज पोजरवार या सासू सूनेचा कौटुंबिक वाद नित्याची बाब झाली होती.
रोजच्या या वादाला कंटाळून सूनेने सासूची हत्या करण्याचा मनोमन विचार केला आणि सदर घटनेला मुहूर्तरूप देण्यासाठी घरासमोर राहणाऱ्या एका सेवानिवृत्त सुभेदार प्रभू गव्हाणकर यांची राहत्या घरून परवानाकृत पिस्तूल आणि सात रांऊड चोरीस गेल्याची घटना दि.२१ जानेवारी रोजी घडली होती.
त्यानंतर गव्हाणकर यांनी पिस्तूल व सात रांऊड चोरी गेल्याची पोलिसात तक्रारदेखील दिली होती. पिस्तूलाचा शोध सुरू असतानाच गव्हाणकर यांच्या घरापुढेच वास्तव्याला असलेल्या सासू आशा पोजरवार याची सून सरोज अरविंद पोजरवार हिने गोळी झाडून सासूची हत्या केली.
अशी घडवली घटना -
सासू सुनेचे नाते हे आई मुली प्रमाणे असते मात्र या घटनेने या नात्याला काळिमा फासला गेला आहे. त्याचे झाले असे की येथील शिवाजी नगर मधील एका सेवानिवृत्त प्रभू गव्हाणकर या अधिकाऱ्यांच्या घरून चार दिवसांपूर्वी एक पिस्तुल व ७ राउंड गोळ्या चोरी गेल्याची घटना घडली होती त्याच परिसरात रहाणाऱ्या एका ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला शव विच्छेदनात डोक्यात गोळी लागून मृत्यू झाल्याचे पुढे आले तेव्हा चोरीला गेलेल्या पिस्तूलाचे बिंग फुटले व सुनेनेच आपल्या सासूचा पिस्तूलाचे खून केल्याचे प्राथमिक चौकशीतून पुढे आले आहे. याविषयी पोलीस सखोल चौकशी करत असून हत्येमागील कारण लवकरच समोर येईल पण नात्यानं मधील कटुता एवढ्या शिगेला जाईल असा प्रकार समाजाला चिंतन करायला भाग पडणारे आहे.
हे देखील पहा -
दरम्यान, सासूचा जीव घेण्याइतपत मजल मारावी अशी धक्कादायक घटना पहिल्यांदाच घडल्याने सूनेचा आक्रमकते बदल समाज आणि नातलगात गंभीर चिंता व्यक्त होत आहे. एकाद्या सूनेचा राग जीव घेण्यापर्यंत पोहचावा हे अगदी धक्कादायक आहे. सासरच्या मंडळी कडून सुनेचा छळ अशा प्रकारच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बातम्या आम्ही नेहनीच ऐकतो परंतु आर्णी येथे एका सुनेने आपल्या सासुवर पिस्तूलातून गोळी झाडून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.