Parbhani Crime News
Parbhani Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Parbhani Crime News: शाळेतून घरी जाताना तरुणाने छेड काढली; भररस्त्यात पोरीने पट्ट्यानेच झोडलं, व्हिडिओ Viral

साम टिव्ही ब्युरो

Parbhani News: परिभणी येथे विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या एका नराधमाला जमावाने चांगलाच चोप दिला आहे. महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. कोणीतरी येऊन आपल्याला मदत करेल असा विचार करण्यापेक्षा प्रत्येक महिलेने स्वत:च अशा नराधमांना चोप द्यायला हवा. परभणी येथे अशीच घटना घडली आहे. विद्यार्थीनीसह परिसरातील इतर व्यक्तींनी देथील नराधमाला बेदम चोप दिला आहे. (Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विद्यार्थीनी आपल्या घरी जात होती. यावेळी रस्त्यात हा रोडरोमीओ उभा होता. त्याने तरुणीला पाहताच तिची वाट आडवली आणि छेड काढण्यास सुरुवात केली. तरुणीने सुरुवातीला या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. मात्र हा नराधम सातत्याने तरुणीची छेड काढत होता. त्यामुळे तिने स्वत:च तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

विद्यार्थीनीची छेड काढल्याच्या कारणावरून त्या विद्यार्थीनीसह तरुणांनी रोडरोमीयोस मारहाण केली. विद्यार्थीनीची छेड काढल्याच्या कारणावरून शे.शाकिब शे.अहमद या रोडरोमियोस विद्यार्थीनीने जाब विचारत चोप दिला. यावेळी परिसरातील नागरिकांनी सुद्धा त्या रोडरोमियोस चोप दिला.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. तसेच पीडित विद्यार्थीनीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध मानवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जिल्हात छेडछाडीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे पालकांनी पोलीस प्रशासनाने चिडिमार पथक स्थापन करावे अशी मागणी केली आहे.

सदर घटनेचा व्हिडिओ देखील मोबाईमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुणाला मारहाण करत त्याचे शर्ट काढण्यात आले. भर उन्हात पट्ट्याने तरुणीने या मुलाला मारहाण केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benifits of Ghee: जेवणामध्ये एक चमचा तूप; शरीराला आरोग्याचे वरदान

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी दिघेंना ठाणे जिल्ह्याचं अध्यक्षपद सोडायला भाग पाडलं, मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Raut | कशाचा शोध घेतायत संजय राऊत?

Avinash Jadhav: खंडणीच्या आरोपानंतर अविनाश जाधवांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT