subhedar ajay dhagale, ratnagiri saam tv
महाराष्ट्र

Subhedar Ajay Dhagale News : अमर रहे...अमर रहे... हुतात्मा सुभेदार अजय ढगळे अमर रहे... मोरवणेत भावपुर्ण वातावरण

हुतात्मा अजय ढगळे हे कारगिल लढाईत टायगर हिल जिंकणाऱ्या जांबाज बहादुर टिमचा हिस्सा होते.

अमोल कलये

Ratnagiri News : अमर रहे, अमर रहे हुतात्मा सुभेदार अजय ढगळे (subhedar ajay dhagale) अशी भावना आज प्रत्येकजण मोरवणे गावात पाेहचताच व्यक्त करीत आहेत. देशशेवा बजावताना वीर मरण आलेल्या सुभेदार अजय ढगळे यांच्यावर आज (मंगळवार) मोरवणे गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यामुळे संपुर्ण माेरवणे गावात माेठ्या संख्येने ग्रामस्थांसह अन्य जिल्ह्यातील नागरिकांची गर्दी आहे. (Breaking Marathi News)

27 मार्चला भारत चीन सीमेवर रस्त्याच्या रेकीसाठी गेलेल्या चमूत सुभेदार अजय ढगळे यांचा समावेश हाेता. भूस्खलनात सुभेदार ढगळे यांना वीर मरण आले. हुतात्मा सुभेदार अजय ढगळे यांचे पार्थिव साेमवारी सायंकाळी भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने रत्नागिरीत दाखल झाले.

मोरवणे गावात पार्थिव पाेहचताच ग्रामस्थांनी अमर रहे...अमर रहे सुभेदार अजय ढगळे अमर रहे... अशा घाेषणा देत त्यांना अभिवादन केले. आज त्यांच्या निवासस्थाना जवळील मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT