Mithil Deshmukh saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : वायुसेनेचे मिथिल देशमुख यांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधींसह हजाराे युवक उपस्थित हाेते.

संजय जाधव

Buldhana News : जळगावजामोद शहरातील भारतीय वायुसेना बंगलोर येथील मेडिकल ट्रेनिंग सेंटर कम्युनिकेशन टेक्निशियन या पदावर कार्यरत असलेले मिथिल दिलीपराव देशमुख (mithil deshmukh) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. हुतात्मा मिथिल देशमुख यांच्यावर वाडी खुर्द या त्यांच्या गावी भावपूर्ण वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (Maharashtra News)

त्यापूर्वी मिथिल देशमुख यांच्या पार्थिवाची शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. शहरातील हिंदू स्मशानभूमी येथ वायुसेनेतील अधिकारी व बटालियन मधील जवानांनी 30 राउंड फायर करीत त्यांना मानवंदना दिली. याप्रसंगी त्यांना वायुदल तथा पोलीस प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव गवळी, तहसीलदार शितल सोलाट, ठाणेदार दिनेश झांबरे, सोनाळा ठाणेदार सागर भास्कर, नायब तहसिलदार मार्कन्ड यांचेसह पोलीस विभाग व वायुदलाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती हाेती. त्याशिवाय शहर व परिसरातील विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकारी आणि हजारो नागरिक (citizens) उपस्थितीत हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Dosh: मंगळमुळे लग्न जमेना! 'या'५ खात्रीशीर उपायांनी दूर होईल मंगळदोष

Parbhani: हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, ५ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Masoor Bhaat Recipe: लहान मुलांना डब्ब्यात द्या पौष्टिक आणि चविष्ट मसूर भात, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट,डोंबिवलीत मनसे आक्रमक, तरुणावर कारवाई

चंद्रपूर गुदमरलं! साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT