chandrapur , land survey
chandrapur , land survey saam tv
महाराष्ट्र

Jiwati : १५ सप्टेंबर पासून सीमावर्ती गावात जमीन मोजणीस प्रारंंभ हाेणार : आमदार सुभाष धोटे

संजय तुमराम

Chandrapur : मुकादमगुडा येथे महाराष्ट्र - तेलंगाना सीमावादात अडकलेल्या १४ गावांच्या जमीन मोजणीसंदर्भात आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत महसूल विभाग व भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिकांची (citizens) समन्वय सभा घेण्यात आली. यानंतर आमदार धाेटे यांनी चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या 14 सीमावर्ती गावात प्रत्यक्ष जमीन मोजणीचे काम येत्या 15 सप्टेंबरपासून सुरू होईल अशी माहिती दिली.

या सभेला मुकादमगुडा, परमडोली तांडा, कोठा बु, लेंडीजाळा, महाराजगुडा, शंकरलोदी, पद्मावती, इंदिरानगर, अंतापूर, येसापूर, परसगुडा, भोलापठार, लेंडीगुडा आदी १४ गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते. तालुक्यातील एकूण ८३ महसूली गावांपैकी फक्त ७५ गावांचा रेकॉर्ड महसूल विभाग तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडे उपलब्ध आहे. परंतु आठ महसूली गावे व सहा गुडे अशा एकूण १४ गावांतील २,३८७ हेक्टर जमीनीचे रेकॉर्ड मागील ४० वर्षापासून उपलब्ध नाहीत.

१४ गावातील नागरिकांनी अभिलेख अद्यावत करण्याच्या दृष्टीने सहकार्य करून वहिवाटीनुसार गावाचे व शेतीचे सीमांकन करण्यासाठी मोजणी नकाशे तयार करणे, नोंदी घेणे, हद्द कायम करणे या कामात पूर्णपणे सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

१५ सप्टेंबर पासून माेजणी सुरु

हा कार्यक्रम १५ सप्टेंबर २०२२ पासून राबविण्यात येऊन ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या कामी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन काम करावे अशा सूचना राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी दिली.

आमदार धाेटे म्हणाले सप्टेंबर महिन्यात संपूर्ण कार्यक्रम राबविण्यात येऊन १४ गावांची जमीन मोजणी करण्यात येईल. प्रत्यक्ष वहिवाटीनुसार नकाशे तयार करण्यात येऊन भूमी अभिलेख विभागाच्या दस्तऐवजात सर्वांच्या नोंदी घेण्यात येईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.

असे झाले तर या गावांवर तेलंगणा राज्याने सांगितलेला हक्क नष्ट होण्याच्या मोठी मदत मिळणार आहे. सध्या या 14 गावातील नागरिक दोन्ही राज्यातील सोयीसुविधांचा लाभ घेत असून मतदानसुद्धा दोन्ही राज्यात करतात.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev App Scam: महादेव ॲपचं श्रीलंका कनेक्शन, EOW ने 200 खात्यांमधील 3 कोटी रुपये गोठवले

IPL 2024 MI vs KKR : अखेरच्या सामन्यातही मुंबईचा पराभव; केकेआर संघाचं प्लेऑफचं तिकीट कन्फर्म

Asaduddin Owaisi: एक दिवस असा येईल जेव्हा हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल: असदुद्दीन ओवेसी

KKR vs MI : मुंबईसमोर कोलकाताचं १६ षटकात १५८ धावांचं लक्ष्य; सामन्यात पावसाचा व्यत्यय

Jalna lok sabha: कोण होणार जालन्याच्या खासदार? भाजपाचा विजयी रथ काँग्रेस रोखणार?

SCROLL FOR NEXT