डोंगरशेळकी येथील पाझर तलाव फुटला; वाहतूक ठप्प दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

डोंगरशेळकी येथील पाझर तलाव फुटला; वाहतूक ठप्प

उदगीर तालुक्यात सतत चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता. आज डोंगरशेळकी येथील पाझर तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात शेतातील पिके वाहून गेल्याने नुकसान झाले आहे.

दीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर : जिल्ह्यातील उदगीर Udagir तालुक्यातील डोंगरशेळकी Dongarshelaki येथील पाझर तलाव तुडूंब भरल्याने फुटला आहे. उदगीर तालुक्यात सतत चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता. या पावसाने तालुक्यातील सर्वच तळे तुडूंब भरून वाहू लागले आहेत. आज डोंगरशेळकी येथील पाझर तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात शेतातील Farm पिके वाहून गेल्याने नुकसान झाले आहे.

हे देखील पहा-

सदरील पाझर तलावाच्या सांडव्याच खोदकाम प्रगतीपथावर सुरू असल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उदगीर पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मारलापले दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली आहे.

सदरचा तलाव फुटल्याने तलावालगत शेती असलेले शेतकरी भारत सिंग गांगासिंग ठाकूर, विठ्ठलसिंग गंगासिंग ठाकूर, सिंधू विठ्ठलसिंग ठाकूर आणि पांडुरंग सोपान पुंड याचं मोठे नुकसान झाले आहे.

सदरील डोंगरशेळकी तलावाचे काम 2003 ते 2005 दरम्यान झाले असून 2015-16 या तलावांची उंची वाढवण्याचे काम झाले. परंतु निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे हा पाझर तलाव फुटला असल्याचं स्थानिक नागरिकांचं मत आहे.

एकूण 12 एकर जमिनीत तलाव झाला होता. हा तलाव भारतसिंग गंगासिंग ठाकूर यांच्या मालकीच्या शेतात झाला होता. हा तलाव फुटल्याने गंगासिंग ठाकुर यांची 6 ते 7 एकर जमीन पाण्याखाली गेली दरम्यान उदगीर ते डोंगरशेळकी गावादरम्यान वाहतूक काही काळ ठप्प होती.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाही, महिलांची e-KYC करण्यासाठी एकच झुंबड; अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT