Ajit Pawar  Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : अजितदादांचा नवा वादा, लाडक्या बहि‍णींना पुन्हा मिळणार 3000 रुपये; केव्हा अन् कधी? वाचा

Ajit Pawar News : आचारसंहितेच्या अगोदर भाऊबीज म्हणून 3 हजार रुपये देणार, हा अजित दादांचा वादा आहे.

Namdeo Kumbhar

Ladki Bahini Yojana Maharashtra : महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होऊ शकतात. त्याची सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारीही कऱण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मतदारसंघात सभा घेतल्या जात आहेत. बीडमध्ये आज अजित पवार यांनी लाडक्या बहीण योजनासंदर्भा मोठं वक्तव्य केलेय. आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहि‍णींना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये देणार आहे, हा अजितदादांचा वादा आहे, असे वक्तव्य बीडमध्ये अजित पवार यांनी केलेय. त्यामुळे दिवाळीच्या आधी लाडक्या बहि‍णींच्या खात्यात आणखी तीन हजार रुपये येणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.

विरोधकांना खडसावले -

लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी टीका केल्या आहेत. मात्र तुमच्या खात्यावर दादांनी 3 हजार रुपये दिले. हे 3 हजार दिले म्हणून विरोधक म्हणतात असे कसे दिले, आम्हाला याविषयी कोर्टात जावे लागेल. कोर्टात जाऊन विरोधीपक्षातील काँग्रेस, तुतारी, मशाल करत आहे. मात्र यांचे परिणाम येणाऱ्या काळात अवकृपा झाल्याशिवाय राहणार नाहीत. आता बहिणीला अन भावाला योजना दिली त्यामुळं त्याच्यावर टीका करता येईना म्हणून आता शेतकऱ्यावर बोलतात, असे अजित पवार म्हणाले.

आरक्षणावर काय म्हणाले अजित पवार -

आरक्षण ज्या ज्या घटकाला पाहिजे ते देत असताना इतरांच्या चेहऱ्यावर देखील हास्य आलं पाहिजे. अन् घेणारांच्या देखील चेहऱ्यावर हास्य आलं पाहिजे, हा विचार करून आरक्षण देऊ. मची माझी जात ही शेतकऱ्यांची जात आहे. आम्ही जातीपातीचा विचार करत नाहीत, काम करणं हीच आमची जात आहे, असे अजित पवार म्हणाले.

घोषणाबाजी करणाऱ्यांना सुनावले -

बीडमध्ये अजित पवार यांच्या भाषणाला सुरुवात होताच, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. एकच वादा अजित दादा...माजलगाव का आमदार कैसा हो जयसिंग भैय्या जैसा हो..यासारख्या घोषणा देण्यास सुरुवात केली. घोषणाबाजी कऱणाऱ्यांना अजित पवार यांनी चांगलेच सुनावले. जर घोषणा बंद केल्या नाही तर मी भाषण बंद करतो म्हणत अजित पवार यांनी सुनावलं.

माजलगाव मतदारसंघावर अजित पवारांचा दावा -

राज्यात जेवढ्या जागा आपल्याला मिळणार आहेत, त्यापैकी 10 टक्के जागा मी मायनॉरिटी समाजाला देणार आहे. मी जाती पातीला मानणारा माणूस नाही. आम्ही लोकसभेला इथली जागा 6 ते 7 हजार मतांनी पडलो, असे म्हणत माजलगाव मतदारसंघावर अजित पवारांचा एकप्रकारे दावा ठोकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT