Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : ३५०० कोटींच्या चेकवर सही करून आलोय, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अजितदादा संतापले

Ladki Bahin Yojana Maharashtra : योजना बंद होणार असल्याचे सांगितले जाते, पण बंद करायची की नाही, ते राज्य सरकार ठरवेल, तुम्हाला कोणी अधिकार दिला, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार मीडियावर संतापलेले पाहायला मिळाले.

Namdeo Kumbhar

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत. जालन्याला येण्याच्या आधी तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या चेकवर सही करून आलोय. येणाऱ्या आठ दिवसात लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. परंतु दिलेला योजनेचा फायदा सुद्धा तुम्ही नीट उचलला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. मीडियावाले सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. पण ती योजना बंद होणार की नाही ते राज्य सरकार ठरवेल, तुम्हाला कोणी अधिकार दिला, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला.

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता येणाऱ्या आठ दिवसात जमा होणार असल्याची माहिती जालन्यातील परतुर येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. जालन्याला येण्याच्याआधी ३५०० कोटी रुपयांच्या चेकवर सही करून आलो आहे. आम्ही शब्दाचे पक्के आहोत दिलेला शब्द पाळणारे आहोत परंतु दिलेल्या योजनेचा फायदा सुद्धा तुम्ही नीट उचलला पाहिजे असे देखील अजित पवार म्हणालेत.

कुठेतरी एक चांगली योजना आणायची, ती ज्या घटकाकरता आणली आहे, त्या घटकाला त्याचा फायदा होण्याचे ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यांनी त्याचा फायदा घेणे हे बरोबर नाही, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, असं देखील अजित पवार म्हणालेत. महिला सक्षम व्हाव्यात, म्हणून लाडकी बहिण योजना आणली, त्यावर किती टीका झाली. अर्थसंकल्प सादर करतावेळी राज्याला आर्थिक शिस्त लावणार आहे, असे अजितदादा म्हणाले.

आर्थिक परिस्थिती चांगली असणाऱ्यांनी योजनेचा लाभ घेणे बरोबर नाही

आर्थिक परिस्थिती चांगली असणाऱ्यांनी योजनेचा लाभ घेणं बरोबर नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. कुठेतरी एक चांगली योजना आणायची, ती ज्या घटकाकरता आणली आहे, त्या घटकाला त्याचा फायदा होण्याचे ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी त्याचा फायदा घेण बरोबर नाही, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, असं देखील अजित पवार म्हणालेत.

दरम्यान, मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार ती योजना बंद होणार ते राज्य सरकार ठरवेल ना तुम्हाला कोणी अधिकार दिला. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार मीडियावर संतापलेले पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple New CEO: Appleचे CEO बदलणार; १५ वर्षानंतर टिम कुक देणार राजीनामा; कोण सांभाळणार धुरा?

ऐन उन्हाळ्यात पाणीबाणी; मुंबई, ठाण्यात २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

Crime: ९ महिन्यांच्या गरोदर महिलेची हत्या, पोटातील बाळाचाही मृत्यू; सोलापूर हादरले

Maharashtra News Live Update: बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांचे जोरदार आंदोलन..

Latur Crime: गॅसवर स्वयंपाक का केला? सासरच्यांकडून सुनेचा छळ; महिलेने दोन चिमुकल्या मुलांसह संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT