MLA Bacchu Kadu Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी 'बच्चू भाऊ' कोर्टाचा दार ठोठावणार, बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'

Bachchu Kadu warns legal action: निकषात न बसलेल्या लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होणार, अशी माहिती महायुती सरकारकडून देण्यात आली. अशातच प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू सरकारला धाऱ्यावर धरलं. तसेच इशाराही दिलाय.

Bhagyashree Kamble

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यभर गाजली. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना अंमलात आणली. लाडक्या बहिणींनी दाखवलेल्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री देवा भाऊ अर्थात महायुतीचं सरकार आलं. महायुतीतील नेते देखील लाडक्या बहिणींना श्रेय देत आहेत. परंतु आता लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

निकषात न बसलेल्या लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होणार, अशी माहिती महायुती सरकारकडून देण्यात आली. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागली. अशातच प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू सरकारला धाऱ्यावर धरलं. तसेच इशाराही दिलाय.

'लाडक्या बहिणींसाठी कोर्टात धाव घेऊ आणि लाडक्या बहिणींसाठी लढू, असं बच्चू कडू म्हणालेत. राज्यात बहिणींचे अर्ज अपात्र होत आहेत. हे सरकार लाडक्या बहिणींवर अन्याय करत आहेत. ही बेईमानी आहे. अपात्र झालेल्या बहिणींना घेऊन आम्ही तक्रार दाखल करणार आहोत', असं बच्चू कडू म्हणालेत.

'निवडणुकीआधी महायुती सरकारनं सरसकट सगळ्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला. मात्र, मतदान झालं, महायुतीचं सरकार आलं, आता सरकार अर्जांची छाननी करत आहेत. हे चुकीचं आहे. मतदानाच्या आधी घाईघाईत अर्ज न तपासता अनुदान दिलं, पण आता अर्ज बाद करत आहेत'.

सरकार फसवणूक करत आहेत. मतदानापूर्वी खिशातले पैसे न देता तिजोरीतले पैसे देऊन सरकारनं भ्रष्टाचार केला आहे. यावर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू. वेळ आली तर, कोर्टात सुद्धा जाऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी महायुती सरकारला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT