Yojana Saam Tv News
महाराष्ट्र

ladki Bahin Yojana: 'देवा भाऊं'च्या सरकारविरोधात ५० लाख बहिणी एकत्र मैदानात उतरणार, शरद पवार गटातील नेत्याचं मोठं विधान

Ladki Bahini Yojana latest news: लाडक्या बहिणींना अपात्र करण्यासाठी सरकार ठाम निर्णय घेणार असेल तर, सरकारच्या विरोधात लाडक्या बहिणी एकत्रित येतील, शरद पवार गटाच्या नेत्यांनी दिला इशारा.

Bhagyashree Kamble

राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुपरहीट ठरल्यानंतर आता लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. विधानसभा निवडणुकी आधी लाडक्या बहिणींना सरसकट लाभ दिला. मात्र, निवडणुकीनंतर याच लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी करण्यास सुरूवात झाली आहे. अनेक लाभार्थी महिलांनी आपले अर्ज मागे घेतले असून, निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात येत आहे. यावर शरद पवार गटातील नेते जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

विधानसभा निवडणुकीआधी राज्यातील लाडक्या बहिणींना सरसकट योजनेचा लाभ दिला. मात्र, निवडणुकीनंतर याच लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी करण्यास सुरुवात झाली. यामध्ये जवळपास ५० लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरत आहेत. यावरून शरद पवार गटातील नेते जयंत पाटील यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

'सरकार राज्यातील लाडक्या बहिणींची फसवणूक करत आहेत. निवडणुकी आधी अर्जाची छाननी न करता, सरकारने सरसकट सगळ्यांना पैसे वाटप केले. मात्र, आता अर्जाची छाननी करण्यात येत असून, लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येत आहे. लाडक्या बहिणींना योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. लाडक्या बहिणींची ही फसवणूकच आहे', असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

लाडक्या बहिणींना अपात्र करण्याबाबत जयंत पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. लाडक्या बहिणींना अपात्र करण्यासाठी सरकार ठाम निर्णय घेणार असेल तर, सरकारच्या विरोधात लाडक्या बहिणी एकत्रित येतील, असा इशारा पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT