Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : महिला दिनाचं मोठं गिफ्ट! लाडकीला 2100 रुपये मिळणार? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana update : लाडक्या बहीणींसाठी खूशखबर हाती आली आहे. लाडक्या बहिणीला 2100 नाही तर थेट 3000 रुपये मिळणार आहेत. त्यांना ३००० रुपयांचं गिफ्ट नेमकं कसं असणार आहे? जाणून घेऊयात.

Tejal Nagre

राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये नाही, तर थेट तीन हजार रुपये मिळणार आहेत. ३ हजारांचं गिफ्ट नेमकं कसं असणार आहे? निकषांची पडताळणी सुरु झाल्यानं सुरु झाल्यानं लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता रखडलेला होता. त्यामुळे महिला दिनाचं स्पेशल गिफ्ट मिळत आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे शनिवारी फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हफ्ता एकत्र यायला सुरवात झालीये.

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात निकषांची कडक तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे किती महिला आतापर्यंत अपात्र ठरल्या आहेत. आता आणखी किती लाडक्या बहिणी अपात्र ठरू शकतात हे पाहुयात

50 लाख लाडक्या बहिणी अपात्र ?

दोन महिन्यात 9 लाख लाभार्थींची संख्या कमी झाली आहे. जानेवारीत 5 लाख महिला अपात्र झाल्या. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात 4 लाख महिला अपात्र झाल्या. भविष्यात 50 लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारचे दरमहा 135 कोटी रुपये वाचणार आहेत. तर वर्षाला 1620 कोटी रुपये वाचणार आहेत.

काही महिलांच्या नावात त्रुटी आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका त्या नावांची पडताळणी घरोघरी जाऊन करणार आहेत. त्यामुळे आणखी काही लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या एकूण एकत्रित 3000 हजारांचा हफ्ता तर लाडक्या बहिणींना मिळायला सुरवात झाली आहे. मात्र 1500 चे 2100 कधी होणार याची उत्सुकताही लाडक्या बहिणींना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

SCROLL FOR NEXT