Sanjay Shirsat On Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा उलट तपासणी होणार का? संजय शिरसाट म्हणाले...

Sanjay Shirsat On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्वाची माहिती समोर आली होती की लाडक्या बहिणींच्या अर्जांची उलट तपासणी केली जाणार आहे.

Priya More

महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेमुळे महायुती सरकारला खूप चांगला फायदा झाला. महायुतीच्या विजयाचं सर्व श्रेय राज्यातील लाडक्या बहिणींना दिलं जात आहे. आता महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रुपये हफ्ता देण्याचे आश्वासन दिले आहे.

पण अशामध्ये या योजनेअंतर्गत महत्वाची माहिती समोर आली होती की लाडक्या बहिणींच्या अर्जांची उलट तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी टेन्शनमध्ये आल्या. पण राज्यातील लाडक्या बहिणींना टेन्शन घेण्याचे काहीच कारण नसल्याचे महायुतीच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. अशामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

संजय शिरसाट यांनी लाडकी बहीण योजनेबाबत सांगितले की, 'राज्यातील लाडक्या बहिणींवर अन्याय होणार नाही. ज्यांचे अर्ज वैध आहेत. त्यांचे अर्ज बाद होणार नाहीत. कुणाला बाद करणार असे नाही. चुकीचे कागदपत्र नसावेत असे आहे.' महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लाडक्या बहिणीबाबत मोठं वक्तव्य केले होते. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना २१०० रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बजेटच्या वेळी लाडकी बहीण योजनेच्या रक्कमेबाबत विचार करू. बजेट ठरवताना आर्थिक स्रोत याबद्दल विचार करू.', असं फडणवीस यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी सरकार एक तपासणी प्रक्रिया सुरू करणार आहे. राज्यातील २ कोटींहून अधिक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत लाभ घेतला आहे. सरकार आता केवळ पात्र महिलांपर्यंतच मदत पोहोचतेय ना? याबाबतची खात्री करण्यावर भर देणार असून यासाठी पडताळणी प्रक्रिया राबवणार आहे. या योजनेसाठी केलेले अर्जदारांचे दावे योग्य आहेत की, नाही याची तपासणी केली जाणार आहे. यामुळे महिलांना आर्थिक सहाय्य व्यवस्थितरित्या मिळेल.

दरम्यान, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिलांना आतापर्यंत ५ महिन्यांचे म्हणजे ५ हफ्त्याचे पैसे मिळाले आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहे. डिसेंबर महिन्याचा म्हणजे सहाव्या हफ्त्याचे पैसे त्यांना अजून मिळाले नाही. आता या सहाव्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न या लाडक्या बहिणींना पडला आहे. तर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हातनुर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीमध्ये १७,०२२ क्युसेक

Mulshi Waterfall : ५ ते १० मिनिटांच्या ट्रेकनंतर दिसतो 'हा' धबधबा, मुळशीजवळ लपलंय सुंदर ठिकाण

Famous Actor : शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला चावला विषारी किडा; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Rain Alert : आजही मुसळधार पाऊस! पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट; मुंबईत पावसाची काय स्थिती? वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT