Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन दूर, मे महिन्याचा हफ्ता मिळाला नाही? लगेच इथे करा तक्रार

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिलांना एप्रिल आणि मे महिन्याचा हफ्ता मिळाला नाही त्या महिलांना टेन्शन घेण्याचे कारण नाही. या महिलांना तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे.

Priya More

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना मे महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता मिळायला सुरूवात झाली आहे. अनेक लाडक्या बहिणींच्या बँक अकाऊंटमध्ये मे महिन्याचा हफ्ता जमा झाला. पण बऱ्याच लाडक्या बहिणींच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले नाही त्यामुळे त्या चिंतेत आल्या आहेत. पण या लाडक्या बहिणींना चिंता करण्याची गरज नाही कारण त्या सरकारने जारी केलेल्या हेल्पलाइन क्रमांकाद्वारे संपर्क करून तक्कार करू शकणार आहेत.

ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हफ्ता मिळाला नाही. त्या महिला या योजनेच्या अधिकृत वेबसाइट ladakibahin.maharashtra.gov.in ला भेट देऊन त्यांच्या अर्जाची स्थिती तपासू शकतात. या महिला हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक १८१ वर संपर्क करून तक्रार करू शकतात. या तक्रारीनंतर निवारण केले जाईल. जर काही अडचणी नसतील तर या महिला लाभार्थींच्या बँक अकाऊंटमध्ये हप्त्याचे पैसे जमा होऊ शकते.

महत्वाचे म्हणजे अनेक लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच हप्ता मिळाला नाही. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांना या हप्त्याचे पैसे मिळतील असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले होते. पण या महिलांना एप्रिल आणि मे महिन्याचा देखील हफ्ता मिळाला नाही. त्यामुळे या महिला चिंतेत आहेत. लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू असल्यामुळे अनेक महिलांची रक्कम रोखण्यात आली आहे. तसंच, जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये २,२८९ महिला सरकारी कर्मचारी या योजनेत सहभागी झाले होते. ही सर्व अपात्र नावे लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आली आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत देत आहे. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकटी देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १५०० रुपयांची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवली जाते. आतापर्यंत लाभार्थी महिलांना ११ हफ्त्याचे पैसे आले आहेत. महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. पण अद्याप सरकारने याबाबत काहीच निर्णय घेतला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA News : मुंबईत गाळ्यांच्या भाड्यात तब्बल १२१ कोटींची फसवणूक; म्हाडाने १० जणांविरोधात केली कारवाई

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

SCROLL FOR NEXT