Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं! आता चारचाकी असणाऱ्यांची घरोघरी जाऊन होणार तपासणी

Ladki Bahin Yojana Application Verification: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवाणारी बातमी आहे. आता लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे की नाही याची तपासणी होणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आता लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार आहे. जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर तुमचे अर्ज बाद केले जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

ज्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहन आहे त्या महिला आता अपात्र होणार आहे. या पडताळणीसाठी राज्य सरकारने नवीन मोहिम राबवली आबे. आता पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका तुमच्या दरवाजात उभी राहणार आहे. तुमच्या घरी येऊन पडताळणी केली जाणार आहे. जर त्यामध्ये तुमच्याकडे चारचाकी वाहन असल्याचे आढळले तर तुम्हाला योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे. (Ladki Bahin Yojana)

मीडिया रिपोर्टनुसार, महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी सोमवारी बैठक घेऊम राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना 'लाडक्या बहिणींच्या' घरी जाऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याच आली आहे. त्यामुळे चारचाकी कोणत्या घरात आहे याची माहिती मिळेल. यामुळे पडताळणीचे काम सोपे होणार आहे

निकष (Ladki Bahin Yojana Criteria)

महिलांचे वय हे २१ ते ६५ वयोगटातील असावे. महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा की असावे. महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन नसावे. तसेच महिला कोणत्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नसावी. जर तुम्ही या निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे.

मंगळवारपासून पडताळणी प्रक्रियेची अंमलबजावणी करत आहोत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेली यादी घेऊन त्यानुसार पडताळणीचे काम पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका करणार आहेत. चारचाकी वाहने असलेल्यांची नावे शासनाला कळविण्यात येतील. (Ladki Bahin Yojana Verification)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरला, भाजपच्या मंत्र्याची राजधानीत घोषणा

Maharashtra Live News Update: अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाचे शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतले शैक्षणिक पालकत्वं

Maharashtra Politics: विलिनीकरणावरून वाद पेटला; अजित पवार गटाच्या आमदाराचा शरद पवार गटावर हल्लाबोल

मोठी बातमी! भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार नाही, कारण आलं समोर

राज्यात मोठी घडामोड! भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे; पत्रावर घेतली स्वाक्षरी? नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT