ladki bahin saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकीची भरभराट, तिजोरीत खडखडाट, लाडकीसाठी वर्षाला 43 हजार कोटींचा खर्च

Debt-Ridden Maharashtra Faces: सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवर वर्षभरात किती कोटींचा खर्च करण्यात आलाय? RTI मध्ये नेमकी कोणती माहिती समोर आलीय? आणि सध्या राज्यावर किती लाख कोटींचं कर्ज आहे?

Girish Nikam

महायुतीला मतांचा जोगवा देणाऱ्या लाडक्या बहिणींनी आता राज्याच्या तिजोरीवरचा ताण वाढवलाय..सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडक्या बहीणींच्या हप्त्यासाठी वर्षभरात तब्बल 43 हजार कोटी वितरीत करण्यात आल्याचं जितेंद्र घाडगे यांच्या RTI मधून समोर आलंय..या माहिती अधिकाराच्या उत्तरात काय माहिती समोर आलीय?

RTI नुसार माहितीनुसार जून 2024 ते जुलै 2025 या वर्षभरात 43 हजार 45 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. एप्रिल 2025 मध्ये सर्वाधिक 2 कोटी 47 लाख महिलांना लाडकीचा लाभ देण्यात आलाय.. मात्र त्यानंतर लाडक्या बहीणींच्या अर्जांची छाननी सुरु झाली आणि 25 लाख महिलांची नावं वगळण्यात आल्यानं दर महिन्याला 375 कोटींची बचत सुरु झाली.. त्यामुळे सरकारने 2025-26 च्या बजेटमध्ये 36 हजार कोटींची तरतूद केलीय...

विधानसभा निवडणुकीनंतर सरकारकडून 25 लाख लाडक्यांना वगळण्यात आलंय.. त्यामुळं आता ही योजना बंद केली जाण्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय.. मात्र मुख्यमंत्र्यांनी ही योजना बंद केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय..

खरंतर राज्यावर 9 लाख 32 हजार कोटींचं कर्ज झालंय.. तर वित्तीय आणि महसुली तूट 2 लाख कोटींच्या वर गेलीय.. तिजोरीवर एवढा ताण असताना आता लाडकीला आता दर वर्षी लाडकीला 43 हजार कोटींची खैरात देणं सरकारला परवडणार आहे का? कारण शेतकरी कर्जमाफीचा मुद्दाही आता जोर धरू लागलाय. त्यामुळे सरकार यात कसा समतोल साधणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malavya Rajyog: 2 नोव्हेंबरपासून मालव्य राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; चारही दिशांनी घरात येणार पैसा

Tirgrahi Yog: 100 वर्षांनी मंगळाच्या राशीमध्ये बनणार पावरफुल त्रिग्रही योग; 'या' 3 राशींवर बरसणार छप्परफाड पैसा

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

SCROLL FOR NEXT