Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana The Indian Express
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ना रक्षाबंधनाच्या दिवशीच मिळणार 'ओवाळी'; खात्यात जमा होणार 3000 हजार रुपये

Bharat Jadhav

वैदेही काणेकर, साम प्रतिनिधी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या योजनेचा शुभारंभ रक्षाबंधनाच्या दिवसापासून होणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील दीड कोटी महिलांना याचा लाभ होणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवसापासून दोन महिन्यांचे एकत्रित हप्ते महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत.

रक्षाबंधनाच्या दिवशीच राज्यातील महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार असल्याने सरकारकडून त्यांना राखीपौर्णिमेची ओवाळी मिळणार आहे. ज्या महिलांच्या कागदपत्रात काहीच अडचण नाही अशा सर्व महिलांना 3 हजार रुपयांचा हप्ता देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत.

लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना यशस्वी व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातीने यात लक्ष घालत असून त्यांनी सर्व मंत्र्यांना योजनेची काम करण्यास सांगितलं आहे. लाडकी बहिण योजनेचे काम १९ ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी कॅबिनेटमध्ये सर्व कॅबिनेट आणि पालकमंत्री मंत्र्यांना दिलेत.

१९ ऑगस्टला दीड कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे राज्य सरकारचा निर्णय असून एकाच दिवशी महिलांच्या खात्यावर ३ हजार रुपये जमा केले जाणार आहेत. ही योजना संपूर्ण तळागातील महिलांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे विरोधकांचा नेरिटिव्ह खोडून काढावा, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी कॅबिनेटमध्ये दिलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT