Ladki Bahin Yojana news  Saam tv
महाराष्ट्र

जुलैचा हप्ता खात्यात कधी जमा होणार? तारीख आली समोर; पण नाव वगळण्यात आलं असेल तर? 'असं' करा चेक

Ladki Bahin Yojana News: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या आधी मिळेल, असे स्पष्ट केलं आहे.

Bhagyashree Kamble

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त महिलांना दिलासा देणारी बातमी आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत १३व्या हप्त्याबाबत माहिती दिली. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच जुलै महिन्याचा निधी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय.

मात्र, अनेक महिलांना अद्यापही जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. आपलं नाव वगळलं आलं का? असा प्रश्न अनेक महिलांना पडत आहे. सध्या सरकारकडून अर्जांची पडताळणी सुरू असून, त्यात अनेक अपात्र लाभार्थ्यांची नावे समोर येत आहेत. काही पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे, तसेच काही महिलांनीही चुकीची माहिती देऊन निधी घेतल्याचे समोर आले आहे.

सरकारी नोकरीत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यास मनाई आहे. तरीही काही सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे आढळून आल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार आहे. मात्र ती कारवाई कधी व कशी केली जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

जर आपण सरकारी कर्मचारी नसूनही आपल्याला अजूनही हप्ता मिळालेला नसेल, तर खालील पद्धतीने यादीत आपलं नाव तपासू शकता:

सर्वात आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

नंतर अंतिम यादीच्या सेक्शनमध्ये जा.

मोबाईल नंबर आणि दिलेला कॅप्चा टाका.

नोंदणीकृत नंबरवर कोड येईल, तो टाका.

योजनेशी संबंधित लिस्ट दिसेल.

यात आपलं नाव आहे की नाही, हे चेक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT