Ladki Bahin Yojana June Installment  Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Ladki Bahin Yojana June Installment : जून महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून येण्यास सुरुवात होणार आहे. याबाबतची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलीय.

Bharat Jadhav

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्त्याची प्रतिक्षा आहे. पण ही प्रतिक्षा आता संपली असून लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलीय. या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे.

महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असं महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.

असा चेक करा तुमचा बॅलन्स

तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेदेखील पैसे जमा झाले की नाही चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल. तिथे जाऊन तुम्हाला पासबुकवर एन्ट्री करावी लागेल. त्यावरुन तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही.

लाडक्या बहि‍णींना कर्ज मिळणार नाही

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कर्जाची नवीन योजना सुरू करण्यात आल्याचे वृत्त माध्यमांमध्ये काही दिवसापूर्वी आले होते. लाडक्या बहि‍णींना ४० हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार असल्याचं सांगितलं जात होत. मात्र, आता अशी कोणतीही योजना नाही असं आदिती तटकरेंनी सांगितलंय. लाडक्या बहि‍णींसाठी अशी कोणतीही वेगळी योजना राबवण्यात येणार नसल्याचं त्या म्हणाल्या.

सरकारी लाडकींना अखेर दणका

सरकारी कर्मचारी असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडकींनाही सरकारनं दणका दिलाय. त्यांचा लाभ बंद करण्यात आल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलीय. जवळपास २ हजार २८९ सरकारी कर्मचारी महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आले आहे. तब्बल ३ कोटी ५८ लाख रूपये सरकारी लाडकीनं लाटले होते. याआधी सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या २,६५२ महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought : शरद पवार यांचा दुष्काळ पाहणी दौरा, बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या

Maharashtra News Live Update: पंढरपूरमध्ये विविध मागण्यांसाठी लोहार समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Pradip Purnekar: मोठी कारवाई! पूर्णेकरांवर गोळ्या झाडणाऱ्या आणखी दोघांना अटक, प्रसिद्ध बिल्डरला चौकशीसाठी बोलावलं

Mirror Work Dupatta: नवरात्रीत दिसा स्टायलिश आणि ट्रेंडी; मिरर वर्क दुपट्टा सेटचे 'हे' ७ सुंदर डिझाइन्स पाहा

Ration Card Update : मोठी बातमी! ऑक्टोबरपासून 1.58 कोटी रेशन कार्ड होणार तात्पुरते बंद; तुमचं कार्ड तर नाही ना?

SCROLL FOR NEXT