Ladki Bahin Yojana SaamTv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी केली 'ही' खास तरतूद; मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात नेमकं काय झालं?, वाचा सविस्तर

CM Devendra Fadnavis : राज्यात लाडकी बहिण योजना ही यापुढेही कायम सुरू राहणार असून याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मोठी घोषणा केली आहे.

Saam Tv

नागपूरात आजपासून सुरू झालेली हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने 35 हजार 788 कोटी रुपयांची पुरवणी मागणी केली आहे. याबाबत आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत या पुरवणी मागण्यांबद्दल माहिती दिली आहे.

आज सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये राज्यातल्या लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद केली असल्याचं फडणवीस यांनी म्हंटलं आहे. मंत्री उदय सामंत यांनी या पुरवणी मागण्या आज अधिवेशनात मांडल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडकी बहीण योजनचे पैसे 1500 रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचे वचन दिले होते. त्यानंतर आता पहिल्याच हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या पुढच्या पैशांची सोय आता मुख्यमंत्र्यांनी सत्ता येताच केलेली आहे.

महायुती सरकारची बहुचर्चित लाडकी बहीण योजना ही दारिद्रय रेषेखाली असणाऱ्या 21 ते 65 वर्षाच्या महिलांसाठी आहे. या आधीच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना 1,500 रुपये मासिक भत्ता देण्यासाठी राज्य सरकारने वार्षिक 46 हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती.

यावेळी देखील 1400 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांत करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यावर 1500 ऐवजी 1200 रुपये जमा होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अद्याप लाडकी बहीण योजनेसाठी वाढीव हफ्ता कधी येणार यावरून सरकारडून कुठलीही घोषणा झालेली नाही. लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला 46 हजार कोटी रुपयांची गरज आहे. सध्या राज्यात अडीच कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. पुरवण्या मागणी ही अर्थसंकल्पात मांडलेल्या व्यतिरिक्त मागण्या असतात. त्यातून 1400 कोटींची मागणी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disabled Scholarship: राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ, शिशुवर्ग ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना दिलासा

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: डोंबिवली एमआयडीसीमध्ये पाणीपुरवठा ठप्प

Farmer Loan waiver : महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ५०० कोटी रुपये मिळणार

एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

SCROLL FOR NEXT