Ladki Bahin Yojana Saam TV
महाराष्ट्र

Ladki Bahin yojana: लाडकी बहीण योजना पुन्हा वादात, मराठीतील अर्ज बाद करण्याचा निर्णय? मनसे आक्रमक

Ladki Bahin Yojana Application: बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसीलदारांनी काढलेलेल्या आदेश पत्रामुळे लाडकी बहीण योजना वादात सापडलीय. काय आहे आदेश हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

संजय जाधव, साम प्रतिनिधी

राज्य सरकारची 'लाडकी बहीण योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याचवेळ मात्र ही योजना वादात सापडलीय. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मराठी भाषेत योजनेचे भरलेले अर्ज रद्द करण्यात येत आहे. याबाबतचा जाहीर आदेश बुलढाण्याचे तहसीलदार यांनी काढलेत. यामुळे ही योजना वादात सापडली असून तहसीलदारांनी काढलेल्या आदेशाचा विरोध बुलढाणा जिल्ह्यातील मनसेने केलाय. मनसैनिकांनी हाताला काळ्या फिती बांधून या निर्णयाचा निषेध केला.

राज्य शासनाची महत्त्वकांक्षी असलेली " लाडकी बहीण योजना " शासनाच्या एका नवीन निर्णयामुळे पुन्हा वादात सापडलीय. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मराठीतून भरलेले लाभार्थींचे अर्ज रद्द करण्यात यावे अशा लेखी सूचना प्रशासनाने दिल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालीय.

लाखो महिला भगिनींनी मराठीतून अर्ज भरलेले आहेत, आता हे अर्ज बाद होण्याच्या भीतीने आणि मराठी भाषेचा अपमान होत असल्याच्या भावनेने मनसे पदाधिकाऱ्यांनी काळ्याफिती लावून शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. यासंबंधी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

SCROLL FOR NEXT