Millions of women under Ladki Bahin Yojana face disqualification as e-KYC deadline approaches April 30. saam tv
महाराष्ट्र

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी...ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता फक्त 4 दिवस शिल्लक राहिलेत.लाडकी बहिण योजनेतील लाखो महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

Girish Nikam

लाडकी बहिण योजनेत लाखो लाभार्थ्यांनी निकषात बसत नसतानाही आणि आर्थिक स्थिती उत्तम असतानाही योजनेत घुसखोरी केली आहे. मात्र आता शासनाच्या तिजोरीतून लूट करणाऱ्या बोगस लाडकींना आता शोधून काढलं जातयं. ऑनलाइन ग्राहक ओळख म्हणजेच ई-केवायसी करण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंतच आहे.यासाठी महिला विकास विभागाने आत्तापर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिली आहे.

26 लाख बहिणी अपात्र?

- राज्यात 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार

- कागदपत्रांच्या कमतरतेमुळे लाखो महिलांची e-KYC प्रक्रिया रखडली

- ई-केवायसीसाठी शेवटचे 4 दिवस शिल्लक, 30 एप्रिलला मुदत संपणार

- चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्यांकडून 165 कोटी वसुलीचा सरकारचा निर्णय

- 12 हजार 415 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीही घेतला लाडकी बहिणीचा लाभ

योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. त्यांच्याकडून वसुलीलाही सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 6 हजार 457 महिलांकडून 11 कोटी रुपये वसूल करण्यात आलेत. दुसरीकडे 12 हजार 757 पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतलाय. सरकारचे 22 कोटी 96 लाख रुपये त्यांनी लाटले आहेत. त्यांच्याकडून वसुली केव्हा होणार ? हा सवाल आहे. काटेकोर निकष लावुन पडताळणी सुरु असल्याने आणि ई-केवायसीमुळे दोन कोटी 47 लाख लाभार्थांपैकी मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरजु महिलांनाच योजनेचा लाभ देण्याचं उद्दीष्ट्य पूर्ण होणार का? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT