Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: डेडलाईन 3 दिवसांवर, e-KYC केली का? लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे

Ladki Bahin Yojana KYC FAQ: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे बंधनकारक आहे. लाजकी बहीण योजनेच्या केवायसीबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

सर्व लाडक्या बहिणींना केवायसी करणे अनिवार्य

ईकेवायसीबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. केवायसी करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. केवायसी करण्यासाठी १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी शेवटचे ३ दिवस उरले आहेत. दरम्यान, अजूनही लाखो महिलांचे केवायसी करणे बाकी आहे. त्यामुळे केवायसी करण्याआधी लाभार्थी महिलांना या गोष्टी माहिती असायलाच हव्यात.

लाडकी बहीण योजनेत जवळपास २.३ कोटी महिला लाभ घेत आहेत. दरम्यान, त्यातून २६.३ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यातील अनेक महिला सरकारी कर्मचारी होत्या. अनेक पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. या सर्वांना योजनेतून बाद करण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य आहे का? (What is the deadline for mandatory e-KYC?)

हो, लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करणे बंधनकारक केले आहे. राज्य सरकारने याबाबत सप्टेंबर २०२५ मध्ये घोषणा केली होती. १२ महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करायची होती. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला. त्या जिल्ह्यातील महिलांसाठी केवायसीमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेचे केवायसी कसे करावे? (How to complete e-KYC for Ladki Bahin Yojana?)

सर्वात आधी तुम्हाला ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

पोर्टल ओपन झाल्यावरच तु्म्हाला होमपेजवर केवायसीचा ऑप्शन दिसेल.

यानंतर तुम्हाला केवायसीसाठी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. ओटीपी आल्यावर तो टाकायचा आहे.

यानंतर तुम्हाला जे प्रश्न विचारतील त्याची माहिती द्यायची आहे. काही कागदपत्रे अपलोड करायची आहे.

यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचे आणि पतीचे केवायसी करायचे आहे. त्यासाठीही सेम प्रोसेस फॉलो करायची आहे.

ई केवायसी प्रोसेसचा स्टेट्‍स काय? (Ladki Bahin Yojane eKYC Status)

ऑक्टोबरमध्ये आदिती तटकरेंनी माहिती दिली होती. त्यानुसार, १.१० कोटी महिलांचे केवायसी पूर्ण झाले आहे. रोज ४-५ लाख महिलांचे केवायसी पूर्ण होत आहेत.

जर केवायसी केले नाही तर काय होणार? (What happens if I do not complete e-KYC in time?)

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. दर महिन्याला जे १५०० रुपये जमा व्हायचे ते मिळणार नाहीत.

लाडकी बहीण योजनेची पात्रता काय? (Ladki Bahin Yojana eKYC Eligibility)

महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.

२१ ते ६५ वयोगटातील महिला पात्र

महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.

महिलांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असावे.

महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Health Tips: हिवाळ्यात सतत आळस येतोय? मग या 5 टिप्स करा फॉलो

Shocking News : पूर्वजांच्या मोक्षासाठी आईचं हैवानी कृत्य , पोटच्या दोन मुलांचा घेतला जीव नंतर...

Aditi Rao Hydari: सिल्क साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये अदिती राव हैदरी ग्लॅमरस लूक व्हायरल, फोटो पहा

Bihar Tragedy : क्षणात होत्याचं नव्हतं; घराला आग लागल्याने एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नितीन गिलबिलेवर गोळीबार करून त्याचा खून करणाऱ्या चारही आरोपींना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT