Women beneficiaries await clarity after 86 lakh names dropped from Ladki Bahin Yojana December installment list Saam Tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! ८६ लाख लाडक्या बहिणींना वगळले, डिसेंबरचा हप्ता किती महिलांना मिळाला? आकडा आला समोर

Ladki Bahin Yojana December Installment Beneficiaries Drop: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर 2025 च्या हप्त्यात तब्बल 86 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले. फक्त 1 कोटी 60 लाख महिलांना ₹1500 चा हप्ता मिळाला. e-KYC अट आणि निधी विलंबामुळे लाभार्थी संख्या घटली.

Omkar Sonawane

महायुती सरकारची प्रमुख योजना असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शेवटचा हप्त्यामध्ये तब्बल 86 लाख महिलांना डच्चू मिळाला आहे. मागच्या वर्षीपर्यंत या योजेनचा 2 कोटी 40 लाख इतक्या महिला लाभ घेत होत्या. मात्र डिसेंबर 2025 महिन्याचा हप्ता फक्त 1 कोटी 60 लाख महिलांनाच मिळाला. सुमारे 86 लाख महिलांना हप्ता मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे.

सप्टेंबर 2025 पासून ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत 2 कोटी 40 लाख लाभार्थ्यांपैकी 1 कोटी 90 लाख महिलांनी e-KYC केली. त्यामध्ये पात्र झालेल्या 1 कोटी 60 लाख महिलांनाच डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे, जर फॉर्म भरताना काही चूक झाली असेल तर 31 मार्च 2026 पर्यंत e-KYC मध्ये बदल करू शकतो. घरातील सदस्य जर कोणी सरकारी नोकरी करत असेल तर त्या महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. तसेच जानेवारीचा हप्ता अद्यापही मिळाला नाहीये. सामाजिक खात्यातून निधीला विलंब होत असल्याने लाडकी बहीण योजेनचा हप्ता रखडल्याचे सांगितले जात आहे.

लाडकी बहीण योजना ही 18 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी आहे. ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे. त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल असे सरकारकडून सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने ही योजना चालू केली होती. यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात 1500 रुपये यायला सुरुवात झाली. मात्र निवडणुकीनंतर अनेक महिलांना या योजेनेतून वगळण्यात आल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme : १ लाख गुंतवा अन् ₹४५,००० मिळवा व्याज; पोस्टाची भन्नाट योजना आताच करा नोट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांकडून सभा स्थळाची पाहणी, बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता सभा

Crime News : तरुणाने लैंगिक अत्याचार केले, धर्मांतरासाठी दबाव टाकला; बीडमधील महिलेसोबत भयंकर घडलं

Trendy Blouse Designs: साडीवर लूक दिसेल अप्सरेसारखा! ऑफशोल्डर ते बॅकलेस ब्लाऊजचे हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Apple New CEO: Appleचे CEO बदलणार; १५ वर्षानंतर टिम कुक देणार राजीनामा; कोण सांभाळणार धुरा?

SCROLL FOR NEXT