Ladki Bahin Yojana saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण अडचणींच्या सापळ्यात; सर्व्हर डाऊनमुळे लाडक्या बहिणींचा हिरमोड

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वादात सापडलीय. तर या योजनेसाठी अर्ज भरताना सर्व्हर डाऊन झाल्याने लाडकी बहीण मात्र हतबल झालीय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना पहिल्या दिवसापासूनच वादात सापडलीय. त्यातच फॉर्म भरण्यासाठी घेण्यात येत असलेले पैसे, सर्व्हर डाऊन, पोर्टल बंद यासारख्या अडचणींमुळे लाडक्या बहिणीचा चांगलाच हिरमोड झाल्याचं राज्यभरातून समोर आलंय.

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात 21 ते 65 वर्षापर्यंतच्या महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलीय. मात्र विविध दाखल्यांसाठी आणि योजनेचा अर्ज करण्यासाठी सेतू केंद्र चालक पैशांची मागणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तसंच अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन, पोर्टल बंदच्याही घटना समोर आल्यात. त्यामुळे सलग तीन दिवस योजनेचा बोजवारा उडाल्याने महिलांना मनस्ताप सहन करावा लागतोय.

लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करताना किंवा दाखले काढताना पैशांची मागणी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलाय. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतील गोंधळावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यातच सर्व्हर बंद, पोर्टल बंद याबरोबरच कागदपत्रांची जुळवा-जुळव करताना महिलांना होणाऱ्या मनस्तापामुळे सरकारने या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत काढून टाकण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT