ADITI TATKARE saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींना आदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज! आजपासून प्रक्रिया सुरु, किती पैसे मिळणार?

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojna: काही दिवसांपूर्वी झालेल्या हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता कधी येणार, याबाबत घोषणा करण्यात आली होती. आजपासून हा हफ्ता मिळण्याची प्रोसेस सुरु झाली आहे.

Ankush Dhavre

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारकडून लागू करण्यात आली आहे. या योजनेचा पुढील हफ्ता कधी येणार, याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागून आहे.

हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता कधी येणार, याबाबत घोषणा करण्यात आली होती. आजपासून हा हफ्ता मिळण्याची प्रोसेस सुरु झाली आहे.

लाडक्या बहिणींना दिवाळी आणि निवडणुका असल्यामुळे २ महिन्यांचा हफ्ता एकत्र देण्यात आला होता. त्यानंतर लाडक्या बहिणी डिसेंबरच्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. ही प्रक्रिया काही दिवसांसाठी थांबवण्यात आली होती.

आता ही प्रक्रिया पुन्हा सुरु झाली असल्याची माहिती महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी योजना असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

आदिती तटकरे यांनी पोस्ट शेअर करत लिहिले,' महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक पाऊल टाकत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेली लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीमुळे ही थांबवण्यात आलेली योजना पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे.

या यादीत २ कोटी ३४ लक्ष महिलांचा समावेश तर असणारच आहे. यासह ज्या महिलांना आधार सिडिंगमुळे या योजनेपासून वंचित राहावं लागलं होतं. त्या महिलांना देखील योजनेचे पैसे मिळणार असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.

१५०० मिळणार की २१००?

लाडकी बहीण ही योजना जुलै महिन्यात सुरु करण्यात आली होती. सुरुवातीला महिलांना १५०० रुपये दिले गेले होते. त्यानंतर दिवाळी आणि निवडणुका पाहता २ महिन्यांचे ३००० रुपये एकत्र देण्यात आले होते. आता डिसेंबरचा हफ्ता आजपासून अकाऊंटमध्ये यायला सुरुवात होणार आहे. यावेळीही लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून साडेसात तास चौकशी

'धनंजय मुंडेंनी गाडी आडवी लावली, हवेत दोन गोळ्या झाडल्या'; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

महिला नेत्याच्या हत्येचा कट उधळला; ISI साठी काम करणारा तरुण दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात

Coconut Ladoo Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे लाडू; फक्त काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Viral Video : ३ वर्षांचं मूल कडेवर घेऊन ट्रेनमध्ये चढत होती महिला; तोल जाऊन खाली पडली, दोन्ही पाय तुटले

SCROLL FOR NEXT