Supriya Sule alleges massive ₹4800 Cr scam in Ladki Bahin Scheme calls for SIT inquiry amid growing evidence of bogus beneficiaries Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

₹4800 Crore Scam In Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना भ्रष्टाचाराचं आगार बनल्याची चर्चा रंगलीय... कारण या योजनेत तब्बल 4 हजार 800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय...मात्र हा घोटाळा नेमका कसा झालाय?

Suprim Maskar

लाडकी बहीण योजनेत झालेले एकेक घोटाळे आता समोर येऊ लागलेत. लाडकीच्या मतांच्या बेरजेसाठी सरकार अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात कित्येक महिने पैसे टाकत होते. यातच आता जवळपास 9 हजार 526 निवृत्त सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आलयं.. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत 4 हजार 800 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. यासंदर्भात एसआयटी चौकशी करा अशी थेट मागणीच त्यांनी केलीय.

दरम्यान खुद्द महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनीच 26 लाख महिलांची वेगवेगळ्या विभागाकडून मिळालेल्या माहितीआधारे पडताळणी करणार असल्याचं सांगितलयं.

शासकीय यंत्रणांनी बहिणींचा अर्ज स्िवकारताना योग्य छाननी केली नव्हती का ?

पुरुषांना लाभ देणाऱ्य़ापूर्वी आधारकार्डसारखी कागदपत्र तपासली नव्हती का?

सरकारनं अर्ज नोंदणीआधी निकष का निश्चित केले नाहीत?

लाडकीचा लाभ देताना इतर योजनेतील लाभांसंदर्भात पडताळणी का करण्यात आली नाही?

एकीकडे 31 हजार कोटींच्या कर्जाच्या थकबाकीसाठी शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यात आरोग्यसाठी अवघे 27 हजार कोटी आणि शिक्षणासाठी फक्त 7 हजार कोटींची वार्षिक तरतूद राज्यात करण्यात आलीय. तर दुसरीकडे लाडक्या बहीण योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. त्यात जवळपास 5 हजार कोटी रुपये बोगस लाडक्या बहिण- भावांना आंदण देण्यात आलेत.. लाडकीचे लाड पुरवणारी योजनाच आता भ्रष्टाचाराचा अड्डा झालीय. त्यामुळे कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात गेले? बोगस लाडकीसह लाडकीचा लाभ घेणाऱ्या पुरुषांकडून वसुली होणार का? लाभाचे पैसे चुकीच्या खात्यात जाण्यामागे नेमकं जबाबदार कोण? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Tenancy Agreements : भाडेकराराची नोंदणी ऑनलाइनच, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Jamnagar Tragedy : गणेश मूर्तीचं विसर्जन करताना पाण्याचा अंदाज चुकला; एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

Maharashtra Government: राज्य सरकार मोठे निर्णय घेणार! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Manoj Jarange Patil: भगवे रुमाल, टोप्या घालून ४०-५० पोलीस आंदोलनात शिरलेत; जरांगेंचा मोठा आरोप

SCROLL FOR NEXT