sangli, krishna river, rain, Koyna Dam saam tv
महाराष्ट्र

Krishna River : काेयनेचे सहा दरवाजे एक फुटावर; औदुंबर दत्त मंदिरात कृष्णेचं पाणी शिरलं (व्हिडिओ पाहा)

गेल्या काही दिवसांपासून सातारा आणि सांगली जिल्ह्यास पावसानं झाेडपलं हाेतं.

विजय पाटील

Sangli Rain News : सांगली (Sangli) येथील आयर्विन पुलाच्या जवळ कृष्णा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे. पाणी पातळी वाढल्याने नदी काठावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान कृष्णा नदीची पाणी पातळी 29 फुटांवर पोहचली आहे. दरम्यान पलूस तालुक्यातील औदुंबर दत्त मंदिरात कृष्णेचं पाणी शिरलं आहे. (Krishna River News)

सातारा आणि सांगली जिल्ह्यात गेले काही दिवसांपासून पावसाचा जाेर वाढला हाेता. आज दाेन्ही जिल्ह्यात पावसानं थाेडी विश्रांती घेतली आहे. आज काेयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुट सहा इंचाने उघडण्यात आले. काेयना नदी पात्रात दहा हजार शंभर क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

दरम्यान सांगलीच्या वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. वारणेचे पात्र पत्राबाहेर पडले आहे. आजूबाजूच्या शेतात पाणी शिरलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कोयनेतून केला जाणार विसर्ग आणि सततचा पडणार पाऊस यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळी 29 फुटावर जाऊन पोहचली आहे.

त्यामुळे कृष्णेचे पात्र हे बाहेर पडले आहे. सांगलीच्या पलूस तालुक्यातील औदुंबर दत्त मंदिरात कृष्णचे पाणी शिरलं. परिणामी भाविकांना दर्शन घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT